भाजप आमदार श्वेता महालें पती अडचणीत? जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश, नेमकं कारण काय?
बुलढाणा बातमी बुलढाणा : प्रशासकीय अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव असलेल्या चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले (Shweta Mahale) यांचे पती विद्याधर महाले हे निवडणूक आचारसंहिता असतानाही राजकीय कार्यक्रमात सहभागी होत असल्याची आणि या निमित्ताने आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. उदयनगर येथील माजी सरपंच असलेल्या मनोज लाहुडकर यांनी निवडणूक आयोगाकडे (Election Commission) हि तक्रार केली होती.
Election Commission : निवडणूक आयोगाकडे तक्रार, जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ चौकशीचे आदेश
दरम्यानया अनुषंगाने निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिला आहे. विद्याधर महाले हे चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांचे पती असून ते प्रशासकीय सेवेत आहेत. तसेच ते सध्या मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव म्हणून कार्यरत आहेत. भारतीय जनता पक्षाने आयोजित केलेल्या मेळाव्यात त्यांनी हजेरी लावून भाजपच्या उमेदवारांना निवडून देण्याचा आवाहन केल्याचा आरोपही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी केला आहे. सोबतच तशी तक्रारही त्यांनी निवडणूक आयोगाकडे केलीहे.याशिवाय चिखली नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असलेले काँग्रेसचे काशिनाथ बोंद्रे यांनीही अशाच प्रकारची तक्रार केल्याने आता निवडणूक आयोग नेमकी काय भूमिका घेतो? हे बघणे महत्त्वाचे आहे. यामुळे मात्र जिल्ह्यात राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
आणखी वाचा
Comments are closed.