अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
मुंबई : भोजपुरी अभिनेता तथा भाजप खासदार नेते मनोज तिवारी यांच्या घरात चोरी झाल्याची घटना घडली असून आंबोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या कोकिलाबेन परिसरातील घरातून 6 लाख रुपयांची चोरी झाली आहे. मनोज तिवारी यांचा घरात काम करणाऱ्या नोकरानेच ही चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांना (POlice) गुन्हा दाखल करुन आरोपी सुरेंद्र शर्मा यास अटक केली आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी त्याला मनोज तिवारी यांनी कामावरून काढले होते
मनोज तिवारी यांनी दोन वर्षांपूर्वीच सुरेंद्र शर्मा यास कामावरुन काढून टाकले असतानाही, तो त्यांच्या घरी येत जात होता. त्याच दरम्यान त्याने मनोज तिवारी यांच्या घराची डुबलीकेट चावी बनवून घरातून 6 लाख रुपये लंपास केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी आंबोली पोलिसांनी चोरी करणाऱ्या आरोपी सुरेंद्र शर्मा विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या आरोपीने यापूर्वी पण कुठे चोरी केली आहे का? या संदर्भात अधिक तपास आंबोली पोलीस करत आहे.
2024 च्या निवडणुकीतून लोकसभेत
गत 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात भाजपकडून सेलिब्रेटींना देखील मैदानात उतरवण्यात आलं होतं. त्यात, मेरठमधून छोट्या पडद्यावरील राम म्हणजेच अरुण गोविल (Arun Govil) यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्यासमोर मेरठच्या माजी महापैर सुनीता वर्मा या समाजवादी पक्षाकडून मैदानात होते. तसेच दिल्लीतून भोजपुरी अभिनेता मनोज तिवारी यांना उमेदवारी देण्यात आली होती. या दोघांनाही विश्वास दाखवत बऱ्याच मताधिक्याने विजय मिळवला. त्यामुळे, अभिनेता मनोज तिवारी हे खासदार बनून संसदेत पोहोचले आहेत. यंदाच्या लोकभेतच भाजपकडून अनेक सेलिब्रिटी मैदानात उतरवण्यात आले होते. या सगळ्यांनी विश्वास दाखवत आता संसदेत एन्ट्री केली आहे. त्यामुळे मुरलेल्या राजकारणांप्रमाणेच सेलिब्रेटींनी देखील विजयाची गुलाल उधळला आहे.
हेही वाचा
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
आणखी वाचा
Comments are closed.