नगराध्यक्षपदासाठी राणी निवडणुकीच्या रिंगणात; मराठी येत नसल्याने महायुतीत वाद, राणेंचा इशारा


सिंधुदुर्ग : कोकणातील सिंधुर्दुर्ग जिल्ह्यात अखेर भाजप-शिवसेना (BJP) युतीचे उमेदवार मैदानात एकत्र उतरले असून स्वबळावरच दोन्ही पक्ष आपली ताकद आजमावत आहते. जिल्ह्यातील सावंतवाडी (Sindhudurg) नगरपरिषद निवडणुकीच्या रिंगणात सावंतवाडीच्या खेम-सावंत राजे घराण्यातील श्रद्धा लखन सावंत भोसले निवडणुकीच्या रणांगणात उतरल्या आहेत. श्रद्धा सावंत भोसले या राजघराण्यातील आणि उच्चशिक्षित असून त्यांना भाजपने नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिली आहे. नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी दिलेल्या पहिल्या मुलाखतीतच त्यांना मराठी बोलता येत नसल्यावरुन त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. आज, या टीकाकारांना भाजप नेते तथा मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उत्तर दिलंय.

श्रद्धा सावंत-भोसले यांना अस्खलित मराठी बोलता येत नसल्याने त्या ट्रोल केलं जात आहे. मात्र, मंत्री नितेश राणे हे श्रद्धा सावंत-भोसले यांच्या बचावासाठी मैदानात उतरले आहेत. श्रध्दा सावंत भोसले या मराठी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. लग्न करून सावंतवाडीत आल्यानंतर त्या सावंतवाडीकर झाल्या आहेत, त्या आपली सस्कृति शिकत आहेत. निवडणुका येतील जातील मात्र आमच्या जिल्ह्यातील माता-भगिनींची अशा प्रकारे बदनामी कोणी करू नये. या गोष्टी आम्ही सहन करणार नाही, याचं उत्तर सावंतवाडीकर 2 तारेखेला देतील, असे म्हणत नितेश राणे यांनी श्रद्धा सावंत-भोसले यांची बाजू माडंली. त्या मराठी भाषा शिकत आहेत, मी म्हणेन त्या चांगल्या मराठी बोलतात, असेही राणेंनी म्हटले.

काय म्हणाले दीपक केसरकर

श्रद्धा सावंत भोसले यांना मराठी बोलता येत नाही हे त्यांनी दिलेल्या व्हिडीओतून पहायला मिळतं. त्यांना मराठी बोलता येत नसल्यामुळे कमी बोलत असतील, असे म्हणत शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी आपली भूमिका मांडली. तसेच, राजघराण्यावर कोणीही टीका केलेली नाही, नितेश राणे यांना कोणीतरी चुकीची माहिती पुरविली आहे. त्यांना मराठी किंवा कोकणी बोलता येत नाही असा एकदाच उल्लेख फक्त जिल्हाअध्यक्ष संजू परब यांनी केला होता.

आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला भाजपने पाठिंबा द्या

नितेश राणेंकडे भाजपसोबत युती करण्यासाठी मी अनेकवेळा गेलो होतो. भाजप शिवसेनेची युती व्हावी ही माझी इच्छा होती. त्यामुळे युती कोणामुळे झाली नाही हे भाजपने पहावं. श्रद्धा भोसले यांना आमच्याकडून उमेदवारी देण्याचा प्रस्ताव सुद्धा आम्ही ठेवला होता. सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीत अजूनही युती होऊ शकते. त्यांनी आपले 10 उमेदवार मागे घ्यावे, आम्ही आमचे 10 उमेदवार मागे घेतो. आमचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा सुशिक्षित आहे. तो सर्वसामान्यांना भेटू शकतो. तो मराठी चांगलं बोलू शकतो. त्यामुळे आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला भाजपने पाठिंबा द्यावा असा प्रस्ताव यावेळी दीपक केसरकर यांनी ठेवला.

नारायण राणेंचा युतीला पाठिंबा

माजी मंत्री नारायण राणे यांनी उपस्थित केलेल्या युतीच्या प्रस्तावाला माझा पाठिंबा होता, या संदर्भात मी रवींद्र चव्हाण यांना सुद्धा भेटलो होतो. अजूनही वेळ गेली नाही, पुढील काळात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांना युतीने सामोरे जाऊया, असेही केसरकर यांनी म्हटलं. यापूर्वी सावंतवाडी नगरपालिकेत 17 शून्य हा विजय मिळवला आहे. या निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती करुन 21 शून्य असं यश मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको, असेही केसरकर यांनी म्हटलं.

हेही वाचा

गुडन्यूज! निवडणुकांपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार जमा; महाराष्ट्रातील 90 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

आणखी वाचा

Comments are closed.