मोठी बातमी : मविआला मोठा धक्का, तब्बल 7 उमदेवारांची माघार, पनवेलमध्ये भाजपचा बिनविरोध धमाका

नवी मुंबई : राज्यातील अनेक महापालिका निवडणुकीत भाजपने (BJP) बिनविरोध उमेदवार विजयी करण्यात यश मिळवलं आहे. त्यामध्ये, कल्याण डोंबिवलीतून भाजपने खातं खोलल्यानंतर आता ठाणे, भिवंडी, अहिल्यानगर आणि आता पनवेल महापालिकेतही मोठ्या संख्येने उमेदवार बिनविरोध केले आहेत. पनवेल महानगरपालिकेत (Mahapalika) महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून पनवेल महापालिका निवडणुकासाठी आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 7 उमेदवारांनी आपला अर्ज माघारी घेतला आहे. त्यामुळे, भाजपचे जवळपास 8 उमेदवार बिनविरोध झाले आहेत. येथून भाजपचे नितीन पाटील सर्वप्रथम बिनविरोध नगरसेवकपदी निवड झाले आहेत.

नितीन पाटील यांची प्रभाग क्रमांक- 18 (ब) मधून हि निवड झाले होते. येथील शेतकरी कामगार पक्षाच्या नगरसेवकाचा छाननी प्रक्रियेत अर्ज बाद झाल्याने पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. परिणामी पनवेल महापालिकेसाठी मतदानापूर्वीच भाजपचा पहिला उमेदवार विजयी झाला. त्यानंतर, आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 7 उमेदवारांचे अर्ज माघारी घेतल्याने एकूण 8 जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे, पनवेल महापालिकेत महायुतीचे 8 नगरसेवक बिनविरोध निवडून आले असून केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. येथील शिवसेना ठाकरे गट, शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्याने भाजपचा विजयी मार्ग सुकर झाला आहे.

बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची नावे –

१) नितीन पाटील
२) रुचिता लोंचे
3) अजय बहिरा
४) दर्शना भोईर
५) प्रियंका कांडपिळे
6) मोमता प्रीतम म्हात्रे
७) स्नेहल ढमाले

पनवेलमध्ये भाजपची सत्ता

पनवेल महापालिकेवर 2017 साली भाजपची एक हाती सत्ता आली होती. महापालिकेत याआधी भाजपची एक हाती सत्ता होती 78 नगरसेविकांपैकी 51 नगरसेवक हे भाजपचे निवडून आले होते. यंदा शिवसेना शिंदे गटासोबत भाजपची युती आहे, मागील निवडणुकीत शिवसेनेला इथे खातंही खोलता आले नाही, परंतु यावेळी युती झाल्याने दोन्ही पक्ष एकत्र आहेत. आम्ही केलेल्या विकास कामाच्या जोरावर ही निवडणूक लढवणार असल्याचे भाजप आमदार प्रशात ठाकूर यांनी सांगत पुन्हा भाजपचा महापौर बसेल असा विश्वास व्यक्त केला आहे. ग्रामीण, पनवेल महापालिकेत शहरी, ग्रामीण सिडको भाग समाविष्ट असून, पाणी, गटारे सार्वजनिक वाहतूक या समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत.

Mahayuti Panvel : महायुतीचे जागावाटप खालील प्रमाणे
एकूण जागा – 78

भारतीय जनता पक्ष – 71
शिवसेना शिंदे गट – 4
राष्ट्रवादी अजित पवार गट – 2
आरपीआय आठवले गट  – 1

Mahavikas Aghadi Panvel : महाविकास आघाडीचे जागावाटप

एकूण जागा – 78
शेतकरी कामगार पक्ष – 33
शिवसेना ठाकरे – 19
राष्ट्रवादी शरद पवार गट – 7
मनसे – 2
काँग्रेस – 12
समाजवादी पक्ष – 01
वंचित बहुजन आघाडी  – 1
इतर  – 3

2017 चे पक्षीय बलाबल-78 नगरसेवक (Party Wise Corporator Panvel 2016)

भाजप – 51
शेकाप – 23
काँग्रेस – 2
राष्ट्रवादी – 2

पनवेलचं राजकीय गणित कसं?

पनवेलचे राजकीय समीकरण हे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या भोवती फिरत आहे, ठाकूर कुटूंबीय शेकाप पक्षात असताना शेकाप ची सत्ता होती, कॉग्रेस पक्षात असताना पनवेल मद्ये कॉग्रेस ची सत्ता होती, भाजपमध्ये असताना भाजप सत्ता आहे ,यावेळी प्रशात ठाकूर यांनी शेकाप पक्ष फोडला असून , शेकापकडे अवघे पाच नगरसेवक उरले आहेत, यामुळे स्ट्रॉंग विरोधी पक्ष ठेवला नसल्याने भाजप ची सत्ता पुन्हा पनवेल महापालिकवर फडकेल असं मत विश्लेषक सांगत आहेत.

आणखी वाचा

Comments are closed.