मोठी बातमी: मुंबईतील मुस्लिम बहुल भागात एकनाथ शिंदेंना पसंती; भाजपाचा सर्व्हे आला समोर
भाजपा-शिवसेना शिंदे गट महायुती महानगरपालिका निवडणूक 2025: मुंबई, ठाण्यासह राज्यातल्या महत्त्वाच्या महापालिका निवडणुका महायुती म्हणून लढवण्यावर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलीय. काल नागपुरात रात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठी) आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांची मॅरेथॉन बैठक झाली. अन्य महापालिकांसाठी स्थानिक समिती स्थापन करून महायुतीवर चर्चा करणार असल्याचं रवींद्र चव्हाणांनी म्हटलं. मात्र मुंबई, ठाण्यासह महत्त्वाच्या महापालिका एकत्रच लढण्याबाबत वरिष्ठ नेते सकारात्मक असल्याची माहिती रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं. राष्ट्रवादी हा महायुतीचाच घटकपक्ष आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. मात्र राष्ट्रवादीसोबत कुठे युती करायची याचा निर्णय स्थानिक पातळीवरील समितीत घेतला जाईल असं रवींद्र चव्हाणांनी स्पष्ट केलं. तर स्थानिक पातळीवरच्या नेत्यांशी आम्ही चर्चा करून युतीसंदर्भात चर्चा करू, कुणालाही (राष्ट्रवादी) बाजूला ठेवण्यासंदर्भात काही चर्चा नाही. आम्ही महायुती म्हणूनच लढू, अशी माहिती एकनाथ शिंदेंनी आज (12 नोव्हेंबर) माध्यमांशी बोलताना दिली.
आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीवर चर्चा सुरु असताना मुंबई महानगरपालिकेबाबत (Mumbai Municipal Corporation Election 2025) एक महत्वाची माहिती समोर आली आहे. भाजपाच्या एका सर्व्हेमध्ये मुस्लिम बहुल भागात भाजपला विरोध होत असून एकनाथ शिंदेंना पसंती मिळत असल्याचं समोर आलं आहे. भाजपाच्या या सर्व्हेत मुंबईतील 18 वॉर्डमध्ये 70 टक्के मुस्लिम बहुल भागात भाजपला विरोध होत असला. तरी एकनाथ शिंदेंच्या नावाला पसंती असल्याचे निदर्शनास दिसून आले. या 18 वॉर्डात एकनाथ शिंदेंनी उमेदवार दिला तर त्याचा फायदा पक्षाला होईल, कारण एकनाथ शिंदेच्या लाडक्या बहिणचा प्रभाव हा मुस्लिम महिलांमध्ये आहे. (Municipal Corporation Election 2025)
मुस्लिम बहुगुणित कुरकुरीत-बेस- (ईकंठ शिंदे ढोंग
भाजपाच्या सर्व्हेमध्ये 18 जागा अशा आहेत जिथे 50 टक्के मुस्लिम बहुल भाग आहे. तर 7 जागावर 35 टक्के मुस्लिम बहुलभाग असून विजयासाठी मुस्लिम मतदार हे महत्वाचे ठरू शकतात. या मुस्लिम बहुलभागातील जागा जिथे एकनाथ शिंदेंच्या नावाला पसंती आहे. त्या जागा एकनाथ शिंदेंना द्यायला भाजपाकडून फारशी रस्सीखेच होणार नाही, माहिती वरिष्ठ नेत्याने दिली. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या लाडकी बहिण योजनेचा करिष्मा पालिका निवडणूकीत चालणार की नाही?, हे आगामी काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
महायुतीच्या त्रिकोणात नवाब मलिक अडथळा- (Nawab Malik BMC Election 2025)
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर महायुतीच्या त्रिकोणात नवाब मलिक अडथळा ठरत आहेत. युतीबाबत भाजपा आणि शिवसेना याच्यात बैठकांचं सत्र सुरू असताना दादांच्या राष्ट्रवादीचा कुठेही सहभाग दिसत नाही.अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मुंबईचं नेतृत्व हे नवाब मलिकांकडे सोपवलं आहे, ज्याला भाजपाचा कडाडून विरोध आहे. मुंबईचं राष्ट्रवादीचं नेतृत्व नवाब मलिक यांच्या ऐवजी इतर कुणाकडेही दिल्यास भाजपाच्या नेत्यांचा कुठलाही आक्षेप नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. लवकरच महायुतीतील तिसरा महत्वाचा पक्ष राष्ट्रवादीला सोबत घेण्याबाबत महायुतीत हालचाली सुरू आहे.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.