पंजाबमध्ये भाजप स्वबळावर लढणार आहे.

वृत्तसंस्था/ चंदीगड

भारतीय जनता पक्षाने 2027 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू केली आहे. पंजाबच्या रणनीतीची थेट जबाबदारी स्वीकारून अमित शाह यांनी राज्यातील सर्व 117 जागांवर पक्षासाठी स्वबळावर उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी दर्शवली आहे. आगामी  निवडणुकीत शिरोमणी अकाली दलासोबत कोणतीही युती होणार नाही आणि भाजप स्वत:च्या अस्मितेवर निवडणूक लढवेल, असे स्पष्ट संकेत अमित शाह यांनी दिले आहेत. सूत्रांनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह चालू महिन्यातच पंजाब भाजप नेत्यांची एक महत्त्वाची बैठक बोलावणार आहेत. या बैठकीत राज्यात सुरू करण्यात येणाऱ्या अमली पदार्थ विरोधी जनसंपर्क मोहिमेला अंतिम स्वरूप दिले जाईल. अमली पदार्थांच्या गैरवापराचा मुद्दा पंजाबच्या राजकारण आणि समाजात अत्यंत संवेदनशील असल्याने प्रभावी जनसंपर्क मोहिमेद्वारे भक्कम जनसमर्थन मिळवण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे.

Comments are closed.