झारखंडमध्ये नथवानी यांचा अर्ज वैध आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी भाजप समर्थित अपक्ष उमेदवार
वृत्तसंस्था/ रांची
झारखंडमधील राज्यसभा निवडणुकीसाठी भाजप-समर्थित अपक्ष उमेदवार परिमल नथवाणी यांचा नामांकन अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी वैध घोषित केला आहे. आता जेएमएमचे उमेदवार बैद्यनाथ राम, काँग्रेसचे उमेदवार प्रणव झा आणि भाजप-समर्थित अपक्ष उमेदवार परिमल नथवाणी असे तीन उमेदवार रिंगणात शिल्लक राहिले आहेत. मंगळवारी नामांकन अर्जांच्या छाननीदरम्यान परिमल नथवाणी यांच्या अर्जात काही चुका आढळून आल्याचा दावा करत पुनर्छाननी करण्याची मागणी करण्यात आली होती.
झारखंडच्या दोन राज्यसभा जागांसाठीच्या नामांकन अर्जांच्या छाननीनंतर अपक्ष उमेदवार परिमल नथवाणी यांची उमेदवारी मंजूर करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या नामांकन अर्जातील तीन मुद्यांवर आक्षेप घेण्यात आले होते. आक्षेपांमुळे विधानसभा प्रभारी सचिव आणि निवडणूक अधिकारी रणजित कुमार यांनी त्यांचे नामांकन स्थगित ठेवले होते. नंतर, परिमल नथवाणी यांच्याकडून या मुद्यांशी संबंधित स्पष्टीकरण मागवण्यात आले. नथवाणी यांनी दिलेल्या उत्तरांनी निवडणूक अधिकारी समाधानी झाल्यानंतर त्यांचा अर्ज वैध घोषित करण्यात आला. तसेच काँग्रेसने उपस्थित केलेले आक्षेपही फेटाळण्यात आले.
Comments are closed.