भाजपचे मुंबईतील ज्येष्ठ नेते राज के पुरोहित यांचे निधन
भाजप नेते राज के पुरोहित यांचे निधन मुंबई भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि मुंबईतील उत्तर भारतीयांचे नेते अशी ओळख असणारे ज्येष्ठ नेते राज के पुरोहित यांचे निधन झाले आहे. ते 71 वर्षांचे होते. मुंबईतील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
राज के. पुरोहित यांचे पार्थिव रविवारी, दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 या वेळेत राजहंस बिल्डिंग, जी रोड, मरीन ड्राइव्ह, मुंबई येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. राज के पुरोहित हे मुंबई भाजपच्या वर्तुळातील मोठे नाव होते. त्यांनी राज्य सरकारमध्ये मंत्रीपदही भुषविले होते. त्यांच्या निधनाने एक अनुभवी, अभ्यासू आणि जनतेशी नाळ जोडलेला नेता काळाच्या पडद्याआड गेला असून, महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक जीवनात ही मोठी हानी मानली जात आहे.
नुकत्याच झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 221 मधून राज पुरोहित यांचा मुलगा आकाश पुरोहित विजयी झाला होता. राज पुरोहित हे एकेकाळी मुंबई भाजपमधील सामर्थ्यशाली नेते म्हणून ओळखले जात होते. दक्षिण मुंबईत त्यांचा मोठा दबदबा होता. गेल्या काही वर्षांमध्ये कुलाब्यात राहुल नार्वेकर यांची ताकद वाढल्यानंतर ते राजकारणातून काहीसे दूर झाले होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.