मुंबईत पहिल्या बंडखोराला भाजपने केलं शांत, देवाभाऊ अन् भगव्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला ला
बीएमसी निवडणूक 2026 भाजपा: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे उमेदवारी अर्ज घेण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. मुंबईत भाजपमधील अनेक इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केले होते. त्यापैकी गोरेगावमधील बंडखोर उमेदवाराला शांत करण्यात भाजपला यश मिळाले आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम (Amit Satam) यांच्याकडून अपक्ष उमेदवार संदीप जाधव (Sandeep Jadhav) यांची यशस्वीरित्या मनधरणी करण्यात आली आहे. अमित साटम यांच्या मध्यस्थीमुळे अखेर भाजपचे (BJP) महामंत्री आणि बंडखोर उमेदवार संदीप जाधव आज आपला अपक्ष म्हणून भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत. (Mumbai Mahanagarpalika Election 2026)
गोरेगाव विधानसभा मतदारसंघात भाजपाचे महामंत्री संदीप जाधव हे प्रभाग क्रमांक 54 मध्ये मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक होते. भाजपाच्या अंतर्गत सर्व्हेमध्ये त्यांचे नाव येऊनसुद्धा प्रभाग क्रमांक 54 मधून त्यांना उमेदवारी न देता विप्लव अवसरे यांना उमेदवारी देण्यात आली. यानंतर नाराज संदीप जाधव यांनी पक्षाला रामराम करून बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या बंडखोरीमुळे प्रभाग क्रमांक 54 मध्ये भाजपला फटका बसण्याची शक्यता होती. त्यामुळे अमित साटम यांनी बुधवारी रात्री संदीप जाधव यांची समजूत काढली.
अमित साटम यांनी संदीप जाधव यांना भविष्यात मुंबई भाजपा कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात येईल आणि पक्षात त्यांचा सन्मान राखला जाईल, असे आश्वासन दिले. मुंबई शहरात भगवा झेंडा फडकावण्यासाठी देवाभाऊच्या नेतृत्वात काम करून देशासाठी आणि मुंबईसाठी काम केला पाहिजे, असे अमित साटम यांनी संदीप जाधव यांना सांगितले. अखेर अमित साटमांनी समजूत काढल्यामुळे संदीप जाधव आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यास राजी झाले आहेत. संदीप जाधव हे आपला अपक्ष उमेदवारी अर्ज माघार घेतल्यानंतर भाजपचे अधिकृत उमेदवार विप्लव अवसरे यांच्या प्रचार करून त्यांना निवडून आणतील, असा विश्वास मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी व्यक्त केला.
Mumbai Election 2026: बंडखोरांना शांत करण्यासाठी देवेंद्र फडणवीस स्वत: मैदानात उतरणार
महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्याविरोधात अपक्ष अर्ज भरुन बंडखोरी केलेल्यांना शांत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: मैदानात उतरणार आहेत. राज्यातील प्रमुख शहरातील बंडखोरांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून संपर्क साधला जात आहे. निवडणुकीत माघार घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांचा अनेक अपक्षांसोबत संवाद झाल्याची माहिती आहे. या बंडखोरांना देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राजकीय पुनर्वसनाचा शब्द दिला जात आहे. तर काही बंडखोरांना शांत करण्याची जबाबदारी भाजपच्या स्थानिक नेत्यांवर सोपवण्यात आली आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.