मुंबईतील भाजपच्या 9 उमेदवारांची नावं ठरली, नील सोमय्या, नवनाथ बन यांना उमेदवारी
BMC निवडणूक 2026: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. भाजपकडून (BJP) युवा मोर्चा अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांना मुंबईतील वॉर्ड क्रमांक 47 मधून उमेदवारी देण्यात आली आहे. माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी यांना वॉर्ड क्रमांक 9 मधून, माजी नगरसेवक जितेंद्र पटेल यांना वॉर्ड क्रमांक 10 मधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन (Navnath Ban) हेदेखील मुंबईतून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. मानखुर्द शिवाजीनगरच्या प्रभाग क्रमांक 135 मधून नवनाथ बन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तर भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचे पुत्र नील सोमय्या यांना मुंबईतील वॉर्ड क्रमांक 107मधून उमेदवारी देण्यात येणार आहे. हे सर्व उमेदवार आजच आपला उमेदवारी अर्ज भरतील, असे सांगितले आहे. भाजपकडून या सर्व उमेदवारांची नावे थोड्यावेळात अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली आहे. मात्र, त्यापूर्वीच या सर्वांना आपापले उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (BJP Candidates list in Mumbai)
भाजपकडून मुंबई महानगरपालिका निवडणुकीत तब्बल 128 जागांवर निवडणूक लढवली जाणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज आणि उद्या असे दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र, भाजपकडून शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी यादी जाहीर करण्यात आलेली नाही. बंडखोरी टाळण्यासाठी भाजपकडून ही काळजी घेण्यात आल्याचे सांगितले जाते. रविवारी रात्रीपासून दादर येथील वसंतस्मृती कार्यालयातून भाजप उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप सुरु झाले आहे. भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जे कार्यककर्ते नाराज होतील, त्यांची मनधरणी करण्याची जबाबदारी आमदारांवर सोपवण्यात आल्याची माहिती आहे.
BJP Candidates list Mumbai: भाजपच्या मुंबईतील उमेदवारांची यादी
नील सोमय्या- वॉर्ड क्रमांक 107
तेजिंदर सिंग तिवाना- वॉर्ड क्रमांक 47
नवनाथ बन- वॉर्ड क्रमांक 135
शिवानंद शेट्टी- वॉर्ड क्रमांक 9
संतोष ढाले- वॉर्ड क्रमांक 215
स्नेहल तेंडुलकर- वॉर्ड क्रमांक 218
अजय पाटील- वॉर्ड क्रमांक 214
सन्नी सानप- वॉर्ड क्रमांक 219
तेजस्वी घोसाळकर- वॉर्ड क्रमांक 2
Mumbai Election news: संजय राऊतांवर टीकेची तोफ डागणारे नवनाथ बन मुंबईतून निवडणुकीच्या रिंगणात
ठाकरे गटाच्या संजय राऊत यांना प्रत्युत्तर देण्यात आघाडीवर असलेले भाजपचे माध्यम प्रमुख आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकवर्तीय नवनाथ बन यांना भाजपने मुंबईतून निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. ते वॉर्ड क्रमांक 135 मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. गेल्या निवडणुकीत या प्रभागातून शिवसेनेचा विजय झाला होता.
आणखी वाचा
उद्धव ठाकरेंनी प्रत्येक उमेदवाराला भेटून एबी फॉर्म हातात ठेवला, मातोश्रीवर रात्री काय-काय घडलं?
आणखी वाचा
Comments are closed.