उद्धव ठाकरेंनी एका रात्रीत एबी फॉर्म वाटले, प्रत्येक उमेदवाराला भेटले, मातोश्रीवर रात्री साडेबा
शिवसेना ठाकरे उमेदवारांची यादी BMC निवडणूक 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून (Shivsena) उमेदवारांना मोठ्याप्रमाणावर एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले. रविवारी रात्री उशीरापर्यंत मातोश्रीवर निवडणुकीचा एबी फॉर्म (AB Form) घेण्यासाठी मातोश्रीवर (Matoshree) उमेदवारांची आणि त्यांच्या समर्थकांची रीघ लागली होती. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे स्वत: प्रत्येक उमेदवाराला भेटून एबी फॉर्म देत होते. यावेळी वर्सोवा मतदारसंघाचे आमदार हरुन खान हेदेखील मातोश्रीवर आले होते. त्यांच्या उपस्थितीत रात्री साडेबारा वाजता वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील सहा वॉर्डातील उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले. यावेळी हारुन खान यांनी मुंबईचा महापौर हा मराठी असेल आणि तो ठाकरेंचाच असेल, असा दावा केला. (BMC Election 2026)
Mumbai Election 2026: वर्सोवा विधानसभा मतदारसंघात सहा वॉर्ड आणि उमेदवारांची नावे
प्रभाग क्र. 59 यशोधर (शैलेश )फणसे
प्रभाग क्र. 60 मेघना विशाल काकडे माने
प्रभाग क्रमांक 61 सेजल दयानंद सावंत
प्रभाग क्रमांक 62 झीशान चंगेज मुलतानी
प्रभाग क्र. 63 देवेंद्र (बाळा) आंबेरकर
प्रभाग क्रमांक 64 सबा हारून खान
Shivsena Thackeray Camp: ठाकरे गटाची उमेदवार यादी आज जाहीर होणार
ठाकरे गटाकडून सोमवारी सकाळी मुंबईसह अन्य महानगरपालिकांमधील उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाऊ शकते. काल रात्री मोठ्याप्रमाणावर मातोश्रीवर एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले. उर्वरित उमेदवारांना आज एबी फॉर्म वाटले जाणार आहेत. मनसे आणि शिवसेनेतील जागावाटपाचा तिढा सुटला असल्याची माहिती माजी खासदार विनायक राऊत यांनी दिली. काल रात्री एबी फॉर्म मिळालेले ठाकरे गटाचे उमेदवारी सोमवारी शक्तीप्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज भरतील.
BJP Candidates list: भाजपकडून एबी फॉर्मचे वाटप
भाजपनेही रविवारी रात्री मुंबई महानगरपालिकेतील उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले. मुंबईतील भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयातून हे एबी फॉर्म वाटण्यात आले. त्यासाठी अनेक उमेदवार आपल्या समर्थकांसह वसंतस्मृती येथे दाखल झाले होते. भाजपने पहिल्या यादीत माजी नगरसेवकांना स्थान दिल्याची प्राथमिक माहिती आहे.
मुंबई महापालिका निवडणूक कार्यक्रम
नामनिर्देशनपत्र स्वीकारणे: 23 डिसेंबर 2025 ते 30 डिसेंबर 2025
नामनिर्देशनपत्रांची छाननी: 31 डिसेंबर 2025
उमेदवारी माघारीची अंतिम मुदत : 02 जानेवारी 2026
निवडणूक चिन्ह वाटप : 03 जानेवारी 2026
अंतिम उमेदवारांची यादी- 03 जानेवारी 2026
मतदानाचा दिनांक : 15 जानेवारी 2026
मतमोजणीचा दिनांक : 16 जानेवारी 2026
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.