मुंबईत शिंदेंमुळे भाजपचं नुकसान; राज्यातील नेत्यांची केंद्रीय नेतृत्वाकडे तक्रार; दिल्लीत काय घ
BJP On मराठी BMC Election Result 2026: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांच्या शिवसेनेमुळे मुंबईत भाजपचं नुकसान झालं. एकनाथ शिंदे यांनी जास्त जागा लढल्याने युतीच्या स्ट्राईक रेटवर परिणाम झाला, अशी तक्रार राज्यातील भाजपच्या नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे केली आहे. एकनाथ शिंदे यांची मुंबईतली कामागिरी निराशाजनक राहिली. भाजप जास्त जागा लढली असती तर भाजपने 100 हून जास्त जागा जिंकल्या असत्या, असंही राज्यातील भाजपच्या नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे आपली भूमिका मांडली, अशी सूत्रांची माहिती आहे.
एकनाथ शिंदेंच्या हॉटेल पॉलिटिक्सवरही नाराजी- (मराठी Shivsena)
मुंबई महानगरपालिकेचा निकाल लागताच शिवसेना शिंदे गटाने निवडून आलेल्या 29 नगरसेवकांना मुंबईतील हॉटेलममध्ये ठेवले आहे. एकनाथ शिंदेंच्या या हॉटेल पॉलिटिक्सवरही भाजपच्या नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वासमोर नाराजी व्यक्त केली आहे. भाजपने 135 जागा लढून 89 जागा जिंकल्या. तर एकनाथ शिंदे यांनी 90 जागा लढून केवळ 29 जागा जिंकल्याने युतीला काठावरचं बहुमत मिळालं आहे.
89 जागा मिळवत मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष- (BJP BMC Election Result 2026)
89 जागा मिळवत मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. तर त्यापाठोपाठ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 65 जागा मिळाल्यात. तर शिंदेंच्या शिवसेनेला 29 जागा मिळाल्या. राज ठाकरेंच्या मनसेला 6 जागा मिळाल्या. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक भाजपचा स्ट्राईक रेट राहिला. भाजपनंतर शिवसेना ठाकरे गटाचा सर्वाधिक स्ट्राईक रेट आहे. तर सर्वात कमी स्ट्राईक रेट राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा राहिला. तर राज्याचा विचार केल्यास भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचा सर्वाधिक स्ट्राईक रेट राहिल्याचे दिसून आले. (Maharashtra Municipal Corporation Election Result 2026)
मुंबईत भाजप नंबर 1, ठाकरे गट दुसऱ्या क्रमांकावर (BMC Election Result 2026)
पक्ष : लढलेल्या जागा/जिंकलेल्या जागा/स्ट्राईक रेट
भाजप : 135/89/66 टक्के
उबाठा : 160/65/40.62 टक्के
शिवसेना शिंदे : 90/29/32.22 टक्के
काँग्रेस : 151/24/15.89 टक्के
शरद पवार राष्ट्रवादी : 11/1/0.90 टक्के
मनसे : 53/6/0.86 टक्के
राष्ट्रवादी काँग्रेस : 37/3/0.81 टक्के
मुंबईत अशी राहिली मतांची टक्केवारी-
भाजप : 45.39 टक्के
उबाठा : 27.37 टक्के
शिवसेना : 10.28 टक्के
काँग्रेस : 9.41 टक्के
मनसे : 2.91 टक्के
मुंबई महापालिकेचा अंतिम निकाल-(BMC Election Result 2026)
भाजप – 89
शिवसेना ठाकरे गट – 65
शिवसेना – 29
काँग्रेस – 24
मनसे – 6
एमआयएम- 8
राष्ट्रवादी-3
एसपी-2
राष्ट्रवादी शप – १
————–
एकूण- 227
संबंधित बातमी:
मुंबई मनपात चकीत करणारं गणित, ठाकरेंकडे दोन हुकूमी एक्के, महापौर आरक्षण सोडतीने धाकधूक वाढवली!
आणखी वाचा
Comments are closed.