भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
मुंबई : नुकतेच झालेल्या मुंबईबाई). महापालिका निवडणुकीत कोणाची सत्ता येणार, कोणाला बहुमत मिळणार, ठाकरेंचा मराठी बाणा चालणार की नाही याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. अखेर मुंबई महापालिकेत सर्वाधिक 89 जागा जिंकत भाजप नंबर एकचा पक्ष ठरला आहे. तर, ठाकरेंची शिवसेना 65 जागा जिंकत दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, याच ठाकरेंच्या शिवसेनेतील (Shivsena) प्रभाग क्रमांक 157 च्या शहर सेविका (BMC) डॉ.सरिता म्हस्के नॉट रिचेबल असल्याने त्या फुटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. चांदिवलीच्या संघर्ष नगर परिसरात मशाल चिन्हावर विजयी झालेल्या सरिता म्हस्केंनी लगेचच ठाकरेंची साथ सोडल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. तसेच, सरिता म्हस्के कोण? असा प्रश्नही अनेकांना पडला आहे.
डॉ.सरिता रवींद्र म्हस्के यांना शिवसेना उबाठा पक्षाकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नगरपालिकेची उमेदवारी दिली होती. उमेदवारीसाठीची आपला एबी फॉर्म त्यांनी मातोश्रीवर जाऊन घेतला. त्यावेळी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने संघर्ष नगरच्या जनतेच्या विश्वासावर आणि तळागाळातील कार्यकर्त्यांच्या सेवेवर भरोसा ठेवत मला उमेदवारी देऊन सामान्य कार्यकर्त्याचा सन्मान केला आहे. या विश्वासाबद्दल आदरणीय पक्षनेतृत्वाचे मनःपूर्वक आभार, अशी फेसबुक पोस्ट सरिता म्हस्के यांनी केली होती. मात्र, आता त्यांनी ठाकरेंची साथ सोडल्याची चर्चा आहे. कारण, आज ठाकरेंच्या शिवसेनेच्या विजयी नगरसेवक गटाची नोंदणी कोकण भवन येथे संपन्न झाली. या नोंदणीला त्यांची अनुपस्थिती होती. त्यामुळे, सरिता म्हस्के कोण याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
डॉ.सरिता रवींद्र म्हस्के मुंबईतील वार्ड क्रमांक 157 मधून शिवसेना ठाकरे पक्षाच्या नगरसेविका आहेत. त्यांचे, पती रविंद्र म्हस्के हे चांदिवलीमधील प्रसिद्ध डॉक्टर आहेत. तर, 2017 मध्ये डॉ. सरिता म्हस्के यांनी काँग्रेस पक्षातून निवडणूक लढवली होती, त्यावेळेस अवघ्या 400 मतांनी त्यांचा पराभव झाला होता. त्यावेळी, येथून शिवसेना पक्षाचा आकांक्षा शेट्टे निवडून आल्या होत्या. त्यांनतर म्हस्के यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, 2025 साली भाजपमधून शिंदेंच्या शिवसेना पक्षात त्यांनी प्रवेश केला. मात्र, महायुतीच्या जागा वाटपात भाजपने ही जागा स्वत:कडे ठेवली, तसेच पुन्हा आकांक्षा शेट्टे यांना उमेदवारी दिल्याने म्हस्केंनी शिंदेंच्या शिवसेनेची साथ सोडली. तसेच, शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश करीत मातोश्रीवर जाऊन नगरसेवक पदाची उमेदवारी घेतली. शिवसेना पक्षाच्या मशाल चिन्हावर त्या विजयी झाला, त्यांनी भाजपच्या आकांक्षा शेट्टे यांचा पराभव केला. मात्र, आता नगरसेविका बनल्यानंतर त्या नॉट रिचेबल असल्याने त्यांच्या फुटीरतावादावर जोरदार टीका होत आहे.
सरिता म्हस्केंना महिनाभराचा वेळ
नगरसेविका सरिता म्हस्के आमच्या संपर्कात आहेत, त्या कुठेही गेलेल्या नाहीत. त्यांनी त्यांचे कौटुंबिक कारण सांगितले आहे. पुढील 1 महिन्यापर्यंत कोकण विभागीय आयुक्तांकडे नोंदणी करण्यासाठी कायदेशीर वेळ आहे. त्यामुळे, डॅा. सरिता म्हस्के यांची नोंदणी होईल. म्हस्के यांनी दिलेले कारण आम्ही कोकण विभागीय आयुक्तांना सांगितले आहे, अशी माहिती अनिल परब यांनी दिली. पुढील 1 महिना त्या न आल्यास काय कारवाई करायची याबाबत पक्षश्रेष्ठीच ठरवतील, पण ती वेळ येणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
आणखी वाचा
Comments are closed.