कॅलिफोर्नियातून दोन महिन्यांपासून बेपत्ता हिंदुस्थानी महिलेचा कालव्यात मृतदेह आढळला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या हिंदुस्थानी वंशाच्या महिलेचा कॅलिफोर्नियातील कालव्यात मृतदेह आढळला. अजित कौर (72) असे मयत महिलेचे नाव असून, ती कॅलिफोर्निया अपार्टमेंट कॉम्प्लेक्समधून बेपत्ता झाली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्देनासाठी रुग्णालयात पाठवला. यानंतर महिलेच्या कुटुबीयांना माहिती देण्यात आली. पोलीस पुढील तपास करत आहेत.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, कौर या 23 ऑगस्ट रोजी सेरेस येथील कासा ग्रांडे अपार्टमेंट कॉम्प्लेक्समधून बेपत्ता झाल्या होत्या. कुटुंबीयांनी पोलिसात त्या बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. शहरातील व्हिटमोर अव्हेन्यू आणि मिशेल रोडजवळ मध्यरात्री 1.45 वाजता त्यांना शेवटचे पाहिले गेले होते. पोलीस त्यांचा शोध घेत होते.

यादरम्यान, 24 ऑक्टोबर रोजी कॅलिफोर्नियातील कालव्यात त्यांचा मृतदेह आढळून आला. एका कामगाराला गस्तीदरम्यान कौर यांचा मृतदेह दिसला. यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. सेरेस पोलिसांनी ऑगस्टपासून बेपत्ता असलेल्या अजित कौर यांचा हा मृतदेह असल्याचे सांगितले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेनासाठी रुग्णालयात पाठवला.

Comments are closed.