अक्षय कुमारनं 8 वर्षांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स; कोट्यवधींची डील कन्फर्म, नफा किती?
अक्षय कुमार मुंबईच्या मालमत्तेची विक्री: बॉलिवूड सेलिब्रिटी (Bollywood Celebrity) आणि त्यांचं नेटवर्थ (Bollywood Celebrity Net Worth) नेहमीच चर्चेचा विषय असतो. फक्त एका फिल्मसाठी कोट्यवधींचं मानधन घेणारे बॉलिवूड सेलिब्रिटींची एकूण संपत्ती ऐकली तर, कधीकधी चक्कर येते. यापैकीच एक बॉलिवूड सेलिब्रिटी म्हणजे, बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar). बॉलिवूडच्या सर्वाधित टॅक्स भरणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत अक्षय कुमारचा समावेश होतो. पण, तुम्हाला माहितीय का? काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारनं मुंबईतील आपले दोन फ्लॅट्स विकून कोट्यवधी रुपयांची डील कन्फर्म केली आहे.
बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारनं मुंबईतील बोरिवली पूर्व येथील त्यांचे दोन अपार्टमेंट 7.10 कोटी रुपयांना विकले आहेत. स्वतःच्या मालकीच्या दोन घरांची डील कन्फर्म करुन अक्षय कुमारनं चांगला नफा कमावला आहे. स्क्वेअर यार्ड्सच्या मते, अक्षयनं मुंबईतील बोरिवली पूर्व येथील ओबेरॉय स्काय सिटी प्रकल्पात बांधलेले त्यांचे दोन निवासी अपार्टमेंट विकले आहेत. या दोन्हींचे व्यवहार आणि नोंदणी जून 2025 मध्ये झाली. अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी ओबेरॉय स्काय सिटीमध्ये अनेक मालमत्ता खरेदी केल्या आहेत.
अक्षयचे दोन्ही अपार्टमेंट खूपच आलिशान
अक्षय कुमारच्या अनेक मालमत्ता स्काय सिटीमध्ये आहेत, ज्या ओबेरॉय रियल्टीनं रिडेव्हलप केल्या आहेत आणि 25 एकर क्षेत्रात पसरलेल्या आहेत. ही एक रेडी-टू-मूव्ह प्रॉपर्टी आहे, ज्यामध्ये 3 बीएचके, 3 बीएचके + स्टुडिओ आणि डुप्लेक्स अपार्टमेंट उपलब्ध आहेत. बोरिवली पूर्व त्याच्या हिरवळीसाठी, चांगल्या पायाभूत सुविधांसाठी, मेट्रो, रोड कनेक्टिव्हिटीसाठी आणि गोरेगाव-मालाड सारख्या व्यावसायिक केंद्रांपर्यंत पोहोचण्यासाठी उत्तम ठिकाण म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे येथील घरांच्या किमती गगनाला भिडल्याचं पाहायला मिळतंय.
8 वर्षांनी विकली प्रॉपर्टी
IGR कागदपत्रांनुसार, अक्षयनं 2017 मध्ये या दोन्ही मालमत्ता खरेदी केल्या. पहिली मालमत्ता 3.02 कोटी रुपयांना खरेदी केली होती आणि आता त्याची किंमत 5.75 कोटी रुपये आहे. तेव्हापासून तिची किंमत 90 टक्क्यांनी वाढली आहे. ती 1,101 चौरस फूट (अंदाजे 102 चौरस मीटर) कार्पेट एरियामध्ये पसरलेली आहे आणि त्यात दोन कार पार्किंग एरिया आहे. या व्यवहारात 34.50 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आणि 30,000 रुपयांचं नोंदणी शुल्क यांचा समावेश आहे.
दुसरं घर अक्षयनं 2017 मध्ये 67.90 लाख रुपयांना खरेदी केली होती आणि ती 1.35 कोटी रुपयांना विकली गेली आहे. त्यामुळे, तिचा किंमत वाढीचा दर 99 टक्के होता. त्याचा कार्पेट एरिया 252 चौरस फूट (23.45 चौरस मीटर) आहे. या व्यवहारात 6.75 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आणि 30,000 रुपये नोंदणी शुल्काचा समावेश आहे.
अक्षयनं यापूर्वीही विकल्यात बऱ्याच प्रॉपर्टी
अक्षयनं प्रॉपर्टी विकण्याची ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वीही अक्षयनं आपली काही घरं विकली होती. अक्षय कुमारनं मार्चमध्ये बोरीवली ईस्टमध्ये असलेलं आपलं अपार्टमेंट 4.35 कोटी रुपयांमध्ये विकलं होतं. ही प्रॉपर्टीही 2017 मध्ये अक्षयनं 2.37 कोटी रुपयांना खरेदी केली होती. यावेळी अक्षला तब्बल 84 टक्क्यांचा नफा झालेला. त्यानंतर एप्रिलमध्ये अक्षयनं मुंबईच्या लोअर परेलमध्ये आपल्या ऑफिस सारखं आणखी एक कमर्शियल प्रॉपर्टी 8 कोटी रुपयांमध्ये विकली, स्क्वेअर यार्ड्सने मिळवलेल्या मालमत्ता नोंदणी कागदपत्रांनुसार, त्याला गुंतवणुकीवर 65 टक्के परतावा मिळाला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
आणखी वाचा
Comments are closed.