मोठी बातमी! दिग्दर्शक रामगोपाल वर्माला 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीचा खटल्यात निकाल
मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा 3 महिन्यांच्या तुरुंगावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. दिग्दर्शकाने 2018 साली एका चित्रपटाच्या आर्थिक व्यवहाराशी संदर्भाने चेक बाऊंस झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी, आता जवळपास 7 वर्षांनी न्यायालयात (Court) अंतिम सुनावणी झाली असू आरोपी रामगोपाल वर्माला दोषी ठरवण्यात आलं आहे. या सुनावणीवेळी आरोपी दिग्दर्शक वर्मा न्यायालयात हजर नव्हता. आपल्या वादग्रस्त वक्तव्याने व ट्विटमुळे चर्चेत असलेल्या रामगोपाल वर्मा यांच्याविरुद्ध 2018 साली श्री नावाच्या कंपनीने फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये, रामगोपाल वर्माला दोषी ठरवून न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे उद्या रामगोपाल वर्माकडून ‘सिंडिकेट’ या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात येणार आहे.
दिग्दर्शक रामगोपाल वर्मा सध्या ‘सत्या’ सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यक्त असून सत्या सिनेमाची सिनेसृष्टीत जोरदार चर्चा आहे. मात्र, त्याच दरम्यान, 7 वर्षांपूर्वीच्या एका चेक बाऊंस प्रकरणात न्यायालयाने रामगोपाल वर्माला तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. 21 जानेवारी रोजी रामगोपाल वर्माला न्यायालयात सुनावणीसाठी बोलवण्यात आले होते, मात्र ते हजर राहिले नाहीत. त्यानंतर, न्यायालयाने फिर्यादीला 3.72 लाख रुपये मोबदला म्हणून देण्याचे निर्देश दिले. न्यायालयाने निगोशिएबल इंस्ट्रूमेंट्स अॅक्टच्या कलम 138 अन्वये आरोप ठेवत आरोपीला दोषी ठरवले आहे. त्यामध्ये, 3 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली.
अंधेरी सत्र न्यायालयात गेल्या 7 वर्षांपासून हा खटला सुरू असून रामगोपाल वर्माविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटही जारी करण्यात आलं आहे. याप्रकरणातील अंतिम सुनावणीवेळ आरोपी न्यायालयात हजर नसल्याने त्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केलं पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले. तसेच, संबंधित पोलीस स्टेशनमध्ये आरोपीला अटक केली पाहिजे आणि तक्रारदारास पुढील तीन महिन्यात 3 लाख 72 हजार रुपयांची रक्कम देण्यात यावी, असे निर्देशच न्यायालयाने दिले आहेत. तसेच, तीन महिन्यात 3 लाख 72 हजार रुपये न दिल्यास आरोपीला तीन महिने तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. दरम्यान, श्री कंपनीचे प्रमुख महेशचंद्र मिश्रा यांनी चेक बाऊंसप्रकरणी हा खटला दाखल केला होता.
दिग्दर्शक आर्थिक संकटात?
दरम्यान, रामगोपाल वर्मा गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटात असल्याची चर्चा बॉलिवूड विश्वात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांनी कुठलाही सिनेमा बनवला नाही. मात्र, सत्या, रंगीला, कंपनी, सरकार, 26/11 यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांचे दिग्दर्शन रामगोपाल वर्मा यांनी केलं आहे.
हेही वाचा
लाडक्या बहिणींकडून पैसे रिकव्हरी करणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांचं एका वाक्यात उत्तर
अधिक पाहा..
Comments are closed.