पाकिस्तानात बॉम्बस्फोट, 9 ठार 23 जण जखमी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

खैबर पख्तूनख्वा प्रांतात भीषण  बॉम्बस्फोट झाला असून या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला असून 23 जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. खैबर पख्तूनख्वा प्रांतातील लक्की मारवत जिह्यातील एका गजबजलेल्या बाजारात हा भीषण स्फोट झाला. बाजारात लोकांची गर्दी होती, त्यावेळी स्फोटकांनी भरलेल्या लोडर रिक्षामध्ये स्फोट झाला. स्फोटानंतर तत्काळ बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. जखमींना उपचारासाठी नौरंग
हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.

Comments are closed.