‘मेटा’मध्ये पुन्हा नोकरकपात; 20 मे रोजी आठ हजार कर्मचारी घरी जाणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आयटी क्षेत्रात सुरू असलेले   नोकरकपातीचे सत्र सुरू आहे. मेटा कंपनीने येत्या 20 मे रोजी आठ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा प्लॅन तयार केला आहे. ही कपात केवळ खर्च कमी करण्यासाठी नसून, कंपनीला नव्या तंत्रज्ञानाशी जोडून घेण्यासाठी आहे, असे सांगण्यात आले आहे.

मेटा कंपनीचे चीफ पीपल ऑफिसर जेनेल गेल यांनी एक इंटरनल मेमो जारी करून या नोकरकपातीची माहिती दिली. एआय तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मेटा आपल्या अंतर्गत रचनेत मोठे बदल करणार आहे. या कर्मचारी कपातीचा परिणाम एकूण मनुष्यबळाच्या 10 टक्के भागावर होईल. याशिवाय 6 हजार रिक्त पदेही बाद केली जाणार आहेत, असे जेनेल गेल यांनी सांगितले.

2026 मध्ये आतापर्यंत ९२ एक हजार कर्मचारी कपात

केवळ एप्रिल 2026 च्या अहवालानुसार, मेटा, ओरॅकल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या अनुभवी कंपन्यांनी सुमारे ४६,७५० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. तर 2026 च्या पहिल्या तीन महिन्यांत जगभरात ९५ हून अधिक कंपन्यांनी ७३,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केले आहे. याचा हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Comments are closed.