दिल्ली विधानसभा अध्यक्षांना बॉम्बस्फोटाची धमकी
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा अध्यक्षांना मंगळवारी ईमेलच्या माध्यमातून बॉम्बची धमकी प्राप्त झाली आहे. या धमकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस सर्व सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करत तपास करत आहेत. विधानसभा परिसरात करण्यात आलेल्या तपासणीत काहीच संशयास्पद आढळून आले नाही. परंतु ही धमकी कुणी पाठविली याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.
Comments are closed.