मुदतपूर्व सुटकेची याचिका हायकोर्टाने फेटाळली, अबू सालेमला दिलासा नाहीच
1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी व गँगस्टर अबू सालेम याला मुंबई उच्च न्यायालयाने आज दिलासा देण्यास नकार दिला. शिक्षेत सूट देण्यात यावी, अशी मागणी करत सालेमने मुदतपूर्व सुटकेसाठी याचिका केली होती. मात्र सालेमची ही याचिका न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठाने फेटाळून लावली. 25 वर्षांहून अधिक काळ तुरुंगात शिक्षा भोगून झाल्याने नियमांनुसार मुदतपूर्व सुटकेसाठी पात्र असल्याचा दावा करत अबू सालेम याने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. टाडा कायद्या अंतर्गत दोषी ठरलेल्या व्यक्तीला शिक्षेत अशा प्रकारची सवलत देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही, असे निरीक्षण नोंदवत हायकोर्टाने सालेमची याचिका फेटाळली.
Comments are closed.