‘मुलगा तुझ्यासारखा दिसत नाही’ म्हणत गावकऱ्यांचे वारंवार टोमणे, बापानं पोटच्या लेकाला मारलं

वडिलांनी स्वतःच्या मुलाचे जीवन संपवले: कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील नागठाण गावात एक विचित्र घटना उघडकीस आली आहे. मुलगा तुझ्यासारखा दिसत नाही असे टोमणे गावातील लोकांनी वारंवार मारल्यामुळे जन्मदात्या बापानेच आपल्या सहा वर्षाच्या मुलाला कृष्णा नदीत बुडवून संपवल्याची घटना तब्बल एक महिन्याने उघडकीस आली आहे. सिद्धार्थ मल्लिकार्जुन अरकेरी (6) असे बापाने नदीत बुडवून मारलेल्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. 16 मार्चला मुलाला कराडजवळ वडोली गावाजवळ कृष्णा नदीत बुडवून बापाने जीव घेतला. गावातील लोक वारंवार तुझा मुलगा तुझ्या सारखा दिसत नाही म्हणून सतवत असल्याने मल्लिकार्जुन अस्वस्थ झाला होता.

वाढदिवसाला मुलाला घेऊन या म्हणताच बिंग फुटलं

मुलाला शाळेत घालून येतो म्हणून मल्लिकार्जुन घरातून मुलाला घेऊन बाहेर पडला. नंतर कराडजवळ वडोलीत नेऊन नदीत मुलाला बुडवून मारले. मुलाला सिंदगी गावातील शाळेत दाखल केले असून तो हॉस्टेलमध्ये राहत असल्याचे मल्लिकार्जुनने घरी आल्यावर सांगितले. एक एप्रिल रोजी सिद्धार्थचा वाढदिवस होता म्हणून पत्नी भाग्यश्रीने मुलाला घरी घेऊन या असा तगादा लावल्यावर मल्लिकार्जुन पळून गेला. त्यामुळे संशय आल्याने पोलिसात तक्रार देण्यात आली. पोलिसांच्या चौकशीत मल्लिकार्जुनने मुलाला कृष्णा नदीत बुडवून मारल्याची कबुली दिली. 16 मार्च रोजी कराडच्या मसूर पोलीस ठाण्यात लहान मुलाचा मृतदेह नदीत सापडल्याची नोंद झाली होती. त्याचे निवेदन पोलिसांनी जाहीर केले होते. हे निवेदन आणि मल्लिकार्जुन याच्या जबानीमुळे कृष्णा नदीत सापडलेला मृतदेह सिद्धार्थचा होता, हे पोलिस तपासात सिद्ध झाले.

व्यापाऱ्याला करंट देऊन संपवलं, कोल्हापूर हादरलं

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी 25 लाखांच्या खंडणीसाठी भाजीपाला व्यावसायिकाचे अपहरण करून काही तासांतच करंट देऊन संपवल्याची घटना कोल्हापुरात उघडकीस आली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी गावात ही घटना घडली. पोलिसांनी दोन मारेकऱ्यांना अटक केल्यानंतर व्यावसायिकाला करंट देऊन मारल्याचे कबूल केले. मृत व्यक्ती भरतेश राजगोंडा टोपगोंडा असे आहे. या प्रकरणात दोघांना जयसिंगपूर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. राजदीप अजय ताडे (21), टिल्लू ऊर्फ मंथन राजेंद्र चंदुरे-पवार (21, दोघे रा. दानोळी) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी बॅटरीचा करंट देऊन भरतेश्वर यांचा खून केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघडकीस आले.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.