अशोक खरातच्या फरार पत्नीच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली; कोर्टात नेमकं काय घडलं?

नाशिक: महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर भोंदू अशोक खरातवार (अशोक खरात) विविध गुन्हे दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. तर, त्याच्या पत्नीवरही गुन्हे दाखल असून कल्पना खरात अद्याप फरार आहे. न्यायालयात कल्पना खरात हिच्या अटकपूर्वक जामीन अर्जावर सध्या सुनावणी सुरू असून, आज पुन्हा ही सुनावणी लांबणीवर पडली आहे. आता पुढील सुनावणी आता 22 एप्रिल रोजी होणार आहे. आरोपीचे वकील व सरकारी पक्ष हजर असताना देखील वकिलांच्या विनंतीवरुन ही सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर टाकण्यात आली. मूळ फिर्यादी रावसाहेब गोंदकर यांच्या वकिलांनी आपलं म्हणणं मांडण्यासाठी न्यायालयाकडे (Court) मागितला वेळ मागितला. मूळ फिर्यादीच्या विनंतीनंतर न्यायालयाने ही वाढीव मुदत दिली.

शिर्डीतील जमीन खरेदी प्रकरणी भोंदू अशोक खरातसह त्याची पत्नी कल्पना खरात हिच्यावर गुन्हा दाखल आहे. मात्र, 31 मार्च रोजी गुन्हा दाखल झाल्यापासून कल्पना खरात अद्याप फरार आहे. एकीकडे पोलिसांनी लुक आऊट नोटीस काढली आहे, तर दुसरीकडे अनेक पथकांकडून तिचा शोध देखील सुरू आहे. दरम्यान, कल्पना खरातने वकिलांच्या माध्यमातून अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला असून राहता सत्र न्यायालयात झालेल्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली. आता, पुढील सुनावणी 22 एप्रिलला होणार असून आरोपीचे वकील व सरकारी पक्ष हजर असताना देखील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली. मूळ फिर्यादी रावसाहेब गोंदकर यांच्या वकिलांनी आपलं म्हणणं मांडण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला. त्यामुळे, मूळ फिर्यादीच्या विनंती नंतर न्यायालयाकडून वाढीव मुदत देण्यात आली आहे.

न्यायालयात आज सुनावणी सुरू होताच न्यायालयाने आरोपींच्या वकिलांबाबत उशिरा आल्याने नाराजी व्यक्त केली. तपास अधिकारी आणि आरोपीचे वकीलही उपस्थित असल्याने सुनावणी घेण्यास न्यायालय अनुकूल होते. मात्र, फिर्यादीच्या वकिलांच्या विनंतीमुळे पुढील सुनावणी आता 22 एप्रिल रोजी होणार आहे.

खरातचे आर्थिक व्यवहार एसआयटीच्या रडावर

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला चौथ्या गुन्ह्याप्रकरणी 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तर भोंदू खरातच्या SIT चौकशीत अद्याप महत्त्वाच्या मुद्द्यांवर तपास सुरू आहे. अशातच आता भोंदूगिरी आणि फसवणुकीच्या प्रकरणात अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणी नवी अपडेट समोर आली आहे. महिलांचे शोषण करणाऱ्या अशोक खरातनं अनेक व्यवसायिक तसेच गृहस्थांनाही गंडवलं होतं. अलीकडेच त्याचा नॅशनलाईज बँकेसंबंधी नवा कारनामा उघड झाला आहे. त्यामुळे अशोक खरातचा पाय आणखी खोलात गेल्याचं दिसून येतंय. परिणामी अशोक खरातचे आर्थिक व्यवहारातील भागीदार आता SIT च्या रडारवर आले आहे.

हेही वाचा

Video: आदित्य ठाकरेंनी महिलेला मारलं, निशिकांत दुबेंच्या आरोपाने सभागृह तापलं, अरविंद सावंत कडाडून म्हणाले, तडीपार माणसाचं नाव घेऊ का?

आणखी वाचा

Comments are closed.