ठाकरे गटाचा अज्ञातवासातील फुटीर खासदार सुप्रिया सुळेंच्या मुलीच्या लग्नात पोहोचला, हसत हसत हात
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती हिचा उद्योगपती अरुण लखानी यांचे सुपुत्र सारंग लखानी यांच्यासोबत विवाहसोहळा काल (शनिवारी, ता २१) मुंबईत पार पडला. या भव्य आणि हायप्रोफाइल विवाहसोहळ्याला विविध क्षेत्रांतील अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली. या शानदार विवाह सोहळ्याची झलक आणि त्यातील काही महत्त्वाचे क्षण सध्या सोशल मिडीयावर चर्चेत आहेत. तर गेल्या काही दिवसांमध्ये ऑपरेशन टायगरच्या निमित्ताने चर्चेत आलेले खासदार संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) यांनी देखील या लग्नाला हजेरी लावल्याचे दिसून आले. विवाहस्थळी येताच फोटोग्राफर, आणि व्हिडीओग्राफर यांनी त्यांना थांबवलं. त्यानंतर त्यांना हात दाखवत आणि आभार मानत ते पुढे निघून गेले.
Sanjay Dina Patil : संजय दिना पाटील बैठकीला येतो म्हणाले अन् गायब झाले
ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असलेल्या सहा खासदारांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. पक्षाने व्हिप बजावूनही ते दिल्लीतील बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. अशातच या बैठकीतील एक मोठी माहिती समोर आली आहे. या बैठकीसाठी लगेच पोहोचतो असं सांगूनही संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) हे आले नाहीत. त्यामुळे शेवटपर्यंत ते खोटं बोलत असल्याचं उघडकीस आलं.
शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर (Operation Tiger) हे यशस्वी झालं असून ठाकरेंच्या पक्षात असलेल्या सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केला आहे. त्यामध्ये संजय जाधव, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील आणि नागेश पाटील आष्टीकर यांचा समावेश आहे.
Uddhav Thackeray MP Meeting : ठाकरेंच्या बैठकीत काय झालं?
ठाकरेंच्या पक्षाचे सहा खासदार फुटणार अशी चर्चा सुरू असतानाच गुरूवारी नवी दिल्लीत संसदीय पक्षाची एक बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला सर्व खासदारांनी उपस्थित राहावेत यासाठी व्हिप बजावण्यात आला होता. परंतु जे सहा खासदार फुटणार अशी चर्चा होती, त्यापैकी कुणीही या बैठकीला उपस्थित राहिलं नाही. या बैठकीला खासदार संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे हे उपस्थित होते.
Sanjay Dina Patil Rebel : संजय दिना पाटलांचा खोटारडेपणा
शुक्रवारच्या बैठकीला आपण उपस्थित राहणार असल्याचं ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी आधीच स्पष्ट केलं होतं. मात्र ते बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे बैठकीच्या ठिकाणाहूनच त्यांना फोन लावण्यात आला. त्यावर आपण विमान पकडून लगेच बैठकीला येत असल्याचं संजय दिना पाटील यांनी सांगितलं.बैठकीला येणार असं शेवटपर्यंत म्हणणारे संजय दिना पाटील हे काही उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून त्यांना कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली आहे.
Revati Sule Wedding: लग्नसोहळ्यात कोण कोण उपस्थित?
सरसंघचालक मोहन भागवत
काँग्रेस नेते राहुल गांधी, मल्लिकार्जून खर्गे
हर्षवर्धन सपकाळ
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे
करण जोहर,
संदीपान भुमरे
पार्थ पवार, कायनत धर
सुनेत्रा पवार
तामिळनाडूचे माजी मंत्री ए.राजा
प्रतापराव पवारांचे कुटुंब
काँग्रेस नेते दिग्विजय सिंह
राजेश टोपे, शशिकांत शिंदे
सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे
खासदार निशिकांत दुबे
जय पवार, पत्नी ऋतुजा पाटील
खासदार बासुरी स्वराज
आमदार धीरज देशमुख
खासदार अमोल कोल्हे,
पुर्वा वळसे पाटील, किरण वळसे पाटील
अनुराग ठाकूर, आमदार श्रीकांत भारतीय
प्रफुल्ल पटेल
मुकूल वासनिक
खासदार विशाल पाटील, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात
शिवानी वड्डेटीवार,
उद्धव ठाकरे कुटुंब
संजय राऊत कुटुंब
मंत्री नरहरी झिरवळ
अमिताभ बच्चन, जया बच्चन
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
सतेज पाटील, दिलीप वळसे पाटील
अभिनेता आणि खासदार रविकिशन
मंत्री पंकजा मुंडे
मुकेश अंबानी, नीता अंबानी
अनंत अंबानी सपत्निक
आमदार रोहित पाटील,
खासदार अनिल देसाई, अतुल सावे
काँग्रेस पक्षाचे महासचिव के.सी.वेणूगोपाल
उद्योगपती आदर पुनावाला
गौतम अदानी, प्रीती अदानी, संजय दीना पाटील
राज ठाकरे कुटुंबीय
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी
अखिलेश यादव पंजाबचे
मुख्यमंत्री भगवंत मान
Sushma Andhare On Krishna Ashtikar : कृष्णा आष्टीकर तू उद्धव ठाकरेंसोबत असशील तर उद्या बापाचं पिंडदान करुन दाखव- सुषमा अंधारे
Comments are closed.