3 वर्ष आयसीसीच्या बंदीने थांबवलं, पण मोडलं नाही! 'या' खेळाडूने पुनरागमन करून ODI क्रिकेटमध्ये रचला इतिहास
झिम्बाब्वेचा अनुभवी विकेटकीपर-फलंदाज ब्रेंडन टेलर याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये इतिहास रचला. तो आपल्या देशाचा सर्वाधिक एकदिवसीय आंतरराष्ट्रीय धावा करणारा खेळाडू ठरला. त्याने ही कामगिरी बांगलादेशविरुद्धच्या तिरंगी मालिकेतील पहिल्या सामन्यात केली. यामध्ये टेलरने १०१ चेंडूंत ८१ धावा केल्या.
अबुधाबीमध्ये शनिवारी (१७ ऑक्टोबर) खेळल्या गेलेल्या या सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. टेलर आणि क्रेग इरविन यांनी चौथ्या विकेटसाठी १५० धावांची भागीदारी केली. इरविनने ९३ धावा केल्या. त्यामुळे झिम्बाब्वेने ५० षटकांत ८ विकेट्स गमावून २७१ धावा केल्या होत्या.
टेलरने ८१ धावा करताना १० चौकार ठोकले. तो झिम्बाब्वेसाठी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. हा विक्रम करताना त्याने ऍंडी फ्लॉवरला मागे टाकले.
झिम्बाब्वेसाठी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
ब्रेंडन टेलर – 6837
ऍंडी फ्लॉवर – ६७८६
ग्रॅंड फ्लॉवर – ६५७१
हॅमिल्टन मसाकाद्झा – ५६५८
शॉन विल्यम्स – ५२१७
आयसीसीची तीन वर्षांची बंदी
आयसीसीने जानेवारी २०२२ मध्ये टेलरवर बंदी घातली होती. आयसीसीने जाहीर केलेल्या एका निवेदनात म्हटले की, टेलरने कथित भ्रष्ट व्यक्तींकडून भेटवस्तू आणि रोख रक्कम स्वीकारली होती. त्याच्यावर भ्रष्टाचार विरोधी पथकाने तपासात विलंब केल्याचा आणि अडथळा आणल्याचा आरोपही केला होता. त्याने हे आरोप स्वीकारले आणि त्याला झालेली शिक्षाही.
टेलर ऑगस्ट २०२५ मध्ये बंदीची शिक्षा पूर्ण करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला. आता तो झिम्बाब्वे क्रिकेटच्या इतिहासत सर्वाधिक एकदिवसीय (आंतरराष्ट्रीय) धावा करणारा खेळाडू ठरला. त्याची ही कामगिरी पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकासाठी महत्त्वाची. २०२७ मध्ये झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रिका आणि नामिबिया येथे पुरुष संघांचा एकदिवसीय विश्वचषक खेळला जाणार आहे.
झिम्बाब्वे विरुद्ध बांगलादेश सामन्याची स्थिती पाहिली तर, लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संपुर्ण संघ ३३.४ षटकांत १७१ धावसंख्येवरच गारद झाला. त्यामुळे झिम्बाब्वेने हा सामना ९९ धावांनी जिंकला. (Brendan Taylor became highest run-scorer for Zimbabwe in men’s ODIs following a excellent knock vs Bangladesh in Abu Dhabi)
Comments are closed.