विनेशच्या वादाशी माझा काहीही संबंध नाही, ब्रिजभूषण सिंह यांचे प्रत्युत्तर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थानची दिग्गज महिला कुस्तीगीर विनेश फोगाटने काही दिवसांपूर्वी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले होते. पण आता ब्रिजभूषण यांनी विनेशच्या आरोपांवर मौन सोडले आहे. विनेशच्या आरोपांवर यावेळी उत्तर दिल्यामुळे आता वादाला नवीन वळण मिळाले आहे.

विनेशने ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्यानंतर गोंडा येथे सुरू झालेल्या राष्ट्रीय खुल्या मानांकन स्पर्धेतून विनेशला वगळले आणि एकच गदारोळ सुरू झाला.

राष्ट्रीय स्पर्धेबाबत खुलासा…

राष्ट्रीय स्पर्धेबाबत ब्रिजभूषण म्हणाले की, या वादाचा माझ्याशी काहीही संबंध नाही. मी आता कुस्ती महासंघाच्या निर्णायक भूमिकेत नाही. कुस्तीचा सामना कुठे होईल किंवा नाही, हा माझ्याशी संबंधित विषय नाही. हे प्रकरण सध्या हिंदुस्थानी कुस्ती फेडरेशनच्या अखत्यारीत येते.

विनेशच्या आरोपांवर मौन सोडले…

विनेशवर जोरदार हल्ला करताना माजी अध्यक्षांनी विनेशचे दावे फेटाळून लावत प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, या महिलेने ज्या वाईट गोष्टी करून ठेवल्या आहेत, त्या सध्या मी दुरुस्त करत आहे. कुस्ती महासंघ कोणत्याही खेळाडूला स्पर्धेत भाग घेण्यापासून कधीही थांबवत नाही. जर कोणाला खरंच थांबवलं असेल, तर त्यांनी त्याचं कारण सांगितलंच असेल.

Comments are closed.