फुटबॉल वर्ल्ड कपचे मोफत प्रक्षेपण करा!
जगभरातील फुटबॉल चाहत्यांचा महोत्सव मानल्या जाणाऱया फुटबॉल वर्ल्ड कपच्या प्रक्षेपणावर हिंदुस्थानात अद्यापही अनिश्चिततेचे ढग कायम आहेत. कोटय़वधी फुटबॉलप्रेमींना वर्ल्ड कपपासून वंचित ठेवण्याचा प्रकार अखेर दिल्ली उच्च न्यायालयाच्या दारात पोहोचला असून, न्यायालयाने केंद्र सरकार आणि प्रसार भारतीला नोटीस बजावत याबाबत जाब विचारला आहे. दूरदर्शन, डीडी स्पोर्ट्स आणि अन्य फ्री-टू-एअर प्लॅटफॉर्मवर फीफा वर्ल्ड कपचे सामने दाखवावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. सामान्य क्रीडाप्रेमींना पैशांच्या भिंतीआड अडकवणे योग्य आहे का, असा थेट सवालही याचिकाकर्त्यांनी उपस्थित केला आहे. न्यायमूर्ती पुरुषेंद्र कुमार कौरव यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.
Comments are closed.