जलतरणपटूने होर्मुझ सामुद्रधुनी पार केली
आखाती देशातील तणाव वाढत चालला आहे. जगातील तेल वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर हल्ले वाढत आहेत. एकीकडे युद्ध सुरू असताना दुसरीकडे मात्र एका ब्रिटिश जलतरणपटूने होर्मुझची सामुद्रधुनी पोहून पार केली. लुईस प्यू (56) असे त्याचे नाव आहे. त्यांनी तीन दिवसांत सुमारे 15 किलोमीटर अंतर पोहून पूर्ण केले. लुईस प्यू यांनी मुसंदम द्वीपकल्पापासून केप ऑफ होर्मुझपर्यंत प्रवास केला. एकूण साडेसहा तास पोहण्याचा सराव केला.
Comments are closed.