जोगेश्वरीत शिवसेनेतर्फे कोकणी-मालवणी जत्रोत्सव

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेनेतर्फे आमदार अनंत (बाळा) नर यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या भव्य कोकणी-मालवणी जत्रोत्सवाला मोठा प्रतिसाद लाभला आहे. या महोत्सवाला माजी विधान परिषद आमदार विलास पोतनीस यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. जत्रोत्सवाच्या माध्यमातून जपली जाणारी कोकणची संस्कृती, परंपरा, खाद्यसंस्कृती आणि मराठी मातीचा सुगंध अनुभवत त्यांनी आयोजकांचे काैतुक केले.

याप्रसंगी महिला विभागप्रमुख शालिनी सावंत, विधानसभा प्रमुख विश्वनाथ सावंत, सुगंधा शेटय़े, नगरसेविका लोना रावत, मानसी जुवाटकर, स्वीकृत नगरसेवक कैलासनाथ पाठक, विधानसभा समन्वयक रवींद्र साळवी, उपविभागप्रमुख अमर मालवणकर, शाखाप्रमुख प्रदीप गांधी, नंदकुमार ताम्हणकर, सुभाष नाईक, महिला शाखा संघटक संजीवनी दणदणे तसेच सर्व महिला/पुरुष पदाधिकारी, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, शिवसैनिक उपस्थित होते.

Comments are closed.