नवी मुंबईतील तुर्भे मेफको मार्केटमध्ये भीषण आग

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

तुर्भे येथील मेफको मार्केट परिसरात आज भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. येथील एका ऑइलच्या गोडाऊनला ही आग लागली. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट आजूबाजूच्या परिसरात वेगाने पसरत असल्याने स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेत अद्याप कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नाही.

Comments are closed.