बसपा पंजाबची निवडणूक स्वबळावर लढणार: मायावती
आघाडीमुळे होते पक्षाचे नुकसान
वृत्तसंस्था/ लखनौ
बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी मंगळवारी पंजाब समवेत उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमधील पक्षाच्या संघटनेच्या स्थितीची विस्तृत समीक्षा केली आहे. पंजाबमध्ये बसप आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार आहे. बसप कुठल्याही पक्षासोबत आघाडी करणार नाही. निवडणूक आघाडीमुळे बसपला जागा अन् मतांच्या हिस्सेदारीत नुकसान होण्याची भीती असते. अशास्थितीत पक्ष कार्यकर्त्यांचे मनोबल कायम ठेवत विरोधकांच्या साम, दाम, दंड आणि भेदच्या व्यूहनीतीचा सामना करण्याची तयारी करावे लागेल असे मायावती यांनी बैठकीत म्हटले आहे.
पुढील वर्षाच्या प्रारंभी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यात यावी. पंजाबमधील सत्तारुढ आम आदमी पक्ष, काँग्रेस आणि भाजप समवेत अन्य पक्षांमुळे दु:खी जनतेला बसपच्या धोरणांशी जोडणे हा पक्षाचा उद्देश आहे. बसपच्या माध्यमातून गरीब, बेरोजगार आणि वंचित वर्गाला आत्मसन्मानासह जीवन जगण्याची संधी मिळायला हवी. याकरता पक्षाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धोरणे प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवायला लागतील. पंजाबमध्ये पक्ष संघटनेला बूथ स्तरापर्यंत मजबूत करण्यात यावे असा निर्देश मायावती यांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे.
Comments are closed.