भाजप आमदारांच्या ड्रायव्हर मृत्यू प्रकरणात राजकीय व्यक्तीचा हात, पत्नीचा गंभीर आरोप, प्रकरण काय

बुलधाना: बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील भाजप कार्यकर्ता व भाजपाचे आमदार संजय कुटे यांच्या कारचालकाचा संशयास्पद मृत्यू गेल्या 3 मे रोजी झाला आता या प्रकरणाला वेगळच वळण लागलं असून पंकज देशमुख यांचा मृत्यू हा मृत्यू नसून घातपात असल्याच त्यांच्या पत्नी सुनीता देशमुख यांनी म्हटलं होत.त्यानुसार या संपूर्ण प्रकरणाची CID चौकशी करण्याची मागणी ही सुनीता देशमुख यांनी केली आहे . या अनुषंगाने आज जिल्ह्यातील सर्वपक्षीय शिष्टमंडळ जिल्हाधिकारी याना भेटून CID चौकशीची मागणी केली आहे . या शिष्टंमडळात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे , काँग्रेसच्या प्रदेश सचिव स्वाती वाकेकर, ठाकरे गटाच्या प्रवक्त्या जयश्री शेळके , शरद पवार गटाचे प्रसंनजित पाटील व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

पंकज देशमुखची आत्महत्या की घातपात?

दरम्यान ” माझ्या पतीने काही शेती घेतली होती व त्या शेतीवर काही राजकीय व्यक्तींचा डोळा होता. त्यामुळे माझ्या पतीच्या हत्येत काही राजकीय व्यक्ती सुद्धा गुंतलेल्या असल्याचा गंभीर आरोप भाजप कार्यकर्ता व डॉ.संजय कुटे यांचा कारचालक पंकज देशमुख यांच्या पत्नी सुनीता देशमुख यांनी केला आहे. त्यामुळे हे सर्व प्रकरण गुंतागुंतीचा आहे . यातील मारेकरी समोर आले पाहिजे. सुनीता देशमुख यांनी ज्या राजकीय व्यक्तींचा संदर्भ दिला आहे ते नेमके कोण? हे शोधून काढणे पोलिसांसमोर आव्हान आहे.

नेमकं प्रकरण काय?

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे भाजप नेते व माजी मंत्री संजय कुटे यांच्या ड्रायव्हरचा मृतदेह शेतात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला होता. या घटनेने मोठी खळबळ उडाली होती. ड्रायव्हर पंकज देशमुख याचा मृत्यू आत्महत्या नसून हत्या असल्याचं त्याच्या पत्नीने सुनिता देशमुखनं म्हटलं होतं. पंकज देशमुख याच्या अंगावर मारहाणीच्या खुणा दिसत असल्यामुळे आत्महत्या की घातपात असा संशय बळावला होता.पंकज देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी विकत घेतलेल्या शेतीवर काही राजकीय व्यक्तींचा डोळा असल्याने या प्रकरणात राजकीय व्यक्ती गुंतल्याचा आरोप त्याची पत्नी सुनीता देशमुख यांनी केलाय. या प्रकरणात आता CID ने लक्ष घालावे. CID ने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी भाजप कार्यकर्ता व आमदार संजय कुटे यांचे ड्रायव्हर पंकज देशमुख यांच्या पत्नीने केली आहे.

हेही वाचा

Shaktipeeth Highway : शक्तिपीठवरुन बीडमध्ये घमासान, मोजणीसाठी आलेले अधिकारी-पोलिसांकडून शेतकऱ्यांना अरेरावी, शेकापचा आरोप

आणखी वाचा

Comments are closed.