धक्कादायक! 70 वर्षीय नराधमाकडून 12 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, बुलढाण्यात संतापजनक घटना

बुलढाणा क्राईम न्यूज : बुलढाण्यात संतापजनक घटना घडली आहे. एका 70 वर्षीय नराधनाने 12 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेनं बुलढाण्यात खळबळ उडाली आहे. समाजमन सुन्न करणारी घटना आहे. या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

बुलढाणा शहराच्या एका परिसरात एका 70 वर्षीय नराधमाने 12 वर्षाच्या चिमूरडीवर अत्याचार केल्याची घटना उजेडात आल्यानंतर बुलढाणा शहरात समाजमन सुन्न झालं आहे. या घटनेमुळं संतापाची लाट उसळली  आहे. दुपारच्या सुमारास गल्लीतच राहणारी एक बारा वर्षीय चिमुरडी 70 वर्षीय शंकर मंगतानी यांच्या घरात आली होती. घरात कोणीच नसल्याची संधी साधत 70 वर्षीय शंकर मंगतानी या नराधमाने या बारा वर्षाची मुरलीवर लैंगिक अत्याचार केला. अशा परिस्थितीत ही चिमुरडीने घर गाठलं व घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला. पालकांनी तात्काळ बुलढाणा शहर पोलीस स्टेशन गाठून 70 वर्षीय शंकर मंगतानी या नराधमाविरुद्ध तक्रार दिल. पोलिसांनी पॉक्सो व विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून शंकर मंगतानी याला बेड्या ठोकले आहेत. या घटनेमुळं बुलढाणा शहरात समाज मन सुन्न झालं असून संतापाची लाट उसळली आहे.

आणखी वाचा

Comments are closed.