दुहेरी हत्याकांडानं बुलढाणा हादरलं; शेती विकण्याच्या वाद अन्…मुलाने केली आई-वडिलांची हत्या, स


बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील अमडापूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या किन्ही सवडद गावात मुलाने आपल्या जन्मदात्या आई वडिलांची हत्या (Buldhana Crime News) केल्याची धक्कादायक घटना रात्री घडली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. महादेव त्रबंक चोपडे, (वय 70) वर्ष) व कलावती महादेव चोपडे (वय 65 वर्ष) असं मृत आई वडिलांच नावं असून मुलगा गणेश महादेव चोपडे याने दोघांची हत्या केली आहे. यातील मृत आई वडील आणि आरोपी मुलगा यांच्यात जमिनीच्या विक्री करण्यावरून वाद झाला व या वादातून मुलाने आपल्या जन्मदात्यानाच (Buldhana Crime News)  संपवून टाकलं आहे. अमडापूर पोलिस ठाण्यात  गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपी आरोपी गणेश चोपडे याला पोलिसांनी अटक केली आहे. या हत्याकांडामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.(Buldhana Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, चिखली तालुक्यातील किन्ही सवडद येथे मुलानेच आई-वडिलांची निघृण हत्या केल्याने जिल्हा पुन्हा हादरला आहे. ही थरारक घटना काल (२७ सप्टेंबर रोजी) सायंकाळी घडली. किन्ही सवडद गावातील आरोपी गणेश महादेव चोपडे (३१) याने स्वतःच्या वडिलांवर महादेव त्र्यंबक चोपडे (७०) व आई कलावतीबाई महादेव चोपडे (६५) यांच्यावर संतापाच्या भरात हल्ला केला. दोघांना बेदम मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झालेल्या दांपत्याचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच अमडापूर पोलिस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून दोन्ही मृतदेह चिखली ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.

Dispute over selling the farm: शेतीच्या वादातून आई-वडीलांना संपवलं

मृत महादेव चोपडे यांना दोन मुले आहेत. आरोपी गणेश हा धाकटा मुलगा असून, दोन्ही मुलांना जमीनीचे हिस्से देण्यात आले होते. मात्र आई कलावतीबाई यांच्या नावे असलेली जमीन विकण्याबाबत घरात वाद सुरू होता. काल (शनिवारी २७ सप्टेंबर रोजी) त्यावरून पुन्हा वाद झाला आणि रागाच्या भरात गणेशने आई-वडिलांना मारून ठार केले, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान ही घटना फक्त शेतीच्या वादातून झाली का, की त्यामागे इतर काही कारणे आहेत, हेही तपासात स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Dispute over selling the farm: जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांचा वाढता आलेख

खामगावातील युवतीची हत्या केल्यानंतर युवकाने स्वतःला चाकूने भोसकून घेत आत्महत्येची घटना ताजी असतानाच चिखली तालुक्यातील किन्ही सवडद येथे मुलानेच आई-वडिलांची निघृण हत्या केल्याचं समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वी ही घटना आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील बायपास परिसरात असलेल्या हॉटेल जुगनूमध्ये मंगळवारी, ता २३ सायंकाळी जिल्ह्यातीलच साखरखेर्डा येथील प्रेमीयुगोलाने रूम भाड्याने घेतली. दोघांमध्ये शाब्दिक वाद झाल्यानंतर प्रियकराने प्रेयसीची भोसकून हत्या केली व त्यानंतर स्वतःलाही चाकूने सपासप वार करत संपवलं. सोनू राजपूत व पायल पवार असं या प्रेमीयुगोलाचे नाव असून दोघेही साखरखेर्डा गावातील होते. याप्रकरणी पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. यावेळी खामगाव शहरात माहिती पसरतात मोठा जमाव या हॉटेल परिसरात जमला होता. यावेळी पोलिसांना गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सौम्य बळाचा वापरही करावा लागला होता. मिळालेल्या माहितीनुसार दोघेही तीन ते चार वर्षापासून प्रेम संबंधात होते.

आणखी वाचा

Comments are closed.