बुलढाणा हादरलं! शिक्षिकेचा मोबाईल हॅक करून अश्लील फोटोद्वारे ब्लॅकमेल; व्हिडिओ कॉल करून विवस्त्

बुलढाणा (सोनाळा): बुलढाणा जिल्ह्यातून सायबर गुन्हेगारी आणि महिलेला धमकावत विवस्त्र व्हिडीओ कॉल (Buldhana Crime News) करायला लावणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका २७ वर्षीय शिक्षिकेचा मोबाईल हॅक करून, त्यातील खासगी डेटा चोरून त्यांना विवस्त्र (Buldhana Crime News) होण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सोनाळा पोलिसांनी ऋषिकेश गिरी (वय २७) नावाच्या आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.(Buldhana Crime News)

मोबाईल हॅक करून चोरला खासगी डेटा

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी ऋषिकेश गिरी याने पीडित शिक्षिकेचा मोबाईल बेकायदेशीरपणे हॅक (Buldhana Crime News) केला होता. हॅकिंगच्या माध्यमातून त्याने शिक्षिकेचे व्हॉट्सॲप चॅट्स, ईमेल आणि गॅलरीमधील अत्यंत खासगी फोटो व व्हिडिओ स्वतःच्या ताब्यात घेतले. यानंतर खरा छळ सुरू झाला. “तुझे हे सर्व फोटो आणि व्हिडिओ मी तुझ्या पतीला व नातेवाईकांना पाठवून तुझी बदनामी करेन,” अशी धमकी त्याने पीडितेला दिली.(Buldhana Crime News)

व्हिडिओ कॉलवर विवस्त्र होण्याची सक्ती

बदनामीच्या धाकाने पीडिता मानसिक तणावाखाली असताना, आरोपीने याचा गैरफायदा घेतला. त्याने शिक्षिकेला वारंवार व्हिडिओ कॉल करून विवस्त्र होण्यास भाग पाडले. नराधम ऋषिकेश एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने या व्हिडिओ कॉलचे स्क्रीन रेकॉर्डिंग करून ते पीडितेच्या बहिणीलाही पाठवले. जेव्हा पीडितेने विरोध केला, तेव्हा “जर तू माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले नाहीस, तर तुला आणि तुझ्या मुलाला ठार मारीन,” अशी जीवघेणी धमकी त्याने दिली.(Buldhana Crime News)

पोलिस कारवाई आणि फरार आरोपी

सततचा छळ आणि मुलाच्या जिवाला असलेला धोका लक्षात घेता, पीडित शिक्षिकेने अखेर सोनाळा पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आहे. कलम 67/2026 नुसार 75(1),75(2),77,78,352,351(2),351(3),356(2) BNS 2023 सहकलम 66(E ), 67,67(A) माहिती तत्रज्ञान अधिनियम 2000 नुसार तात्काळ गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी ऋषिकेश गिरी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. सायबर सुरक्षेबाबत नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

आणखी वाचा

Comments are closed.