भाजप-शिंदे गटातील संघर्ष टोकाला, संजय गायकवाड भाजपच्या जिल्हाध्यक्षाला म्हणाले, ‘डान्सबारमध्ये


बुलढाणा नगरपरिषद बुलढाणा: नगरपरिषद निवडणुकीमध्ये राज्यात आमची काही ठिकाणी युती आहे, तर काही ठिकाणी आघाडी आहे. राज्यात प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे. मात्र काही असलं तरी राज्यात महायुतीच यश संपादन करेल आणि महायुतीचा झेंडा फडकेल. दरम्यान, बुलढाणा(बुलढाणा) शहरात भाजप (BJP) आणि शिवसेना एकमेका विरोधात उभी ठाककेली नाही, तर उपऱ्या गटाचा जिल्हाप्रमुख आणि आम्ही उभे आहोत. ओरिजनल भारतीय जनता पक्षाला बुलढाण्यात युती हवी होती. मात्र त्यांनी केली नाही. ज्या घरातून भारतीय जनता पक्ष सुरू झाला त्याच लोकांना यांनी उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे ही लढाई भाजपा आणि शिवसेना नाही. भाजपामध्ये आलेल्या बाहेरच्या गटाची आणि ओरिजनल भाजपा आणि शिवसेना गटाची लढाई आहे. असे म्हणत आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी भाजप जिल्हाध्यक्ष विजय शिंदे (BJP Vijay Shinde) यांच्यावर बोचरी टीका केलीय.

Sanjay Gaikwad: ….तर लोकांनी आम्हाला लाथाळलं असतं

इतक्या मोठ्या राज्यात, पक्षात काम करताना छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात. थोड्याशा गोष्टीमध्ये भाजप आणि आमच्यात वित्तुष्ट येईल असं काही होणार नाही. माझ्या पत्नीला उमेदवारी देण्याचं कारण म्हणजे ती दोन वेळेस नगराध्यक्षपदी राहिलेली आहे. वीस वर्ष ती नगरसेवक राहिलेली आहे आणि मी 28 वर्ष. माझा सर्व परिवार हा जनतेसाठी लढतो. त्यामुळे जनताच म्हणते की, आम्हाला तुमच्या परिवारातील द्या. जर मी उमेदवार लादला असता तर लोकांनी आम्हाला लाथाळलं असतं, निवडून दिलं नसतं. असेही आमदार संजय गायकवाड म्हणाले.

एकेकाळी यांच्याच घरातील लोकांनी महिलांवर बलात्कार केले

जे माझ्यावर आरोप करतात त्यांना त्यांचा परिवार सुद्धा सांभाळता आला नाही. त्यांच्याकडे सत्ता असताना त्यांनी सगळी सत्ता डान्स बारमध्ये गमावली. त्या बायकांसोबत नाचून इकडे जनतेकडे फिरकायला यांना वेळ नव्हता. यांनी कधी घरी जेवलेच नाही, कार्यकर्त्यांनाच मातीत घातलं. अशी घणाघाती टीकाही आमदार संजय गायकवाड यांनी केलीय. एकेकाळी यांच्याच घरातील लोकांनी महिलांवर बलात्कार केले. हे काय महिलांचे रक्षण करणार आहेत. असेही ते म्हणाले.

ओरिजनल भाजपचे लोक माझ्यासोबत, त्या ‘उपऱ्याशी’ माझी लढत नाही

बुलढाण्यात माझी लढत माझ्या मित्र पक्षाशी नाही तर. ओरिजनल भाजपचे लोक माझ्यासोबत आहेत. “त्या उपऱ्याशी” माझी लढत नाही. माझी लढत होईल तर ती काँग्रेसची होईल कारण “हा” (विजयराज शिंदे भाजपा जिल्हाध्यक्ष) काँग्रेसचा डमी उमेदवार आहे. हा एका आमदाराकडे बोलला आहे की मी जिंकण्यासाठी नाहीतर पाडण्यासाठी उभा आहे, त्यामुळे त्याचा जिंकायचा विषयच नाही.

महत्वाच्या बातम्या:

आणखी वाचा

Comments are closed.