धक्कादायक! शेगावमध्ये युवकाची भोकसून हत्या, परिसरामध्ये भीतीचं वातावरण, आरोपीचा शोध सुरु


बुलढाणा क्राईम न्यूज : बुलढाणा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. शेगाव शहरातील चिंच परिसरात थोड्याच वेळापूर्वी युवकाची भोसकून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. नितीन गायकवाड असं या हत्या करण्यात आलेल्या युवकाच नावं आहे. तो मूळचा वाशीम येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र त्याची हत्या कुणी व कशासाठी केली याचा शोध आता शेगाव शहर पोलीस घेत आहेत.

भविकांची शेगावमध्ये गर्दी, भीतीचं वातावरण

शेगाव शहरात धक्कादायक घटना घडली आहे. शहरात एका युवकाची हत्या करण्यात आली आहे. दिवाळीच्या सुट्यामुळे लाखो भविकांची शेगावमध्ये गर्दी असल्याने भविकांमध्ये भीतीच वातावरण पसरलं आहे. दरम्यान, या युवकाची हत्या नेमकी का झाली? कोणी केली? याबाबतचा पुढील तपास शेगाव शहर पोलीस करत आहेत.

महत्वाच्या बातम्या:

अवघ्या 10 महिन्यांपूर्वी लग्नाच्या बेडीत, त्वचारोगतज्ज्ञ डॉक्टर पत्नी म्हणाली, पोटात दुखतंय; गॅस्ट्रो-सर्जन डॉक्टर पतीनं तिथंच संधी शोधली अन्… तब्बल सहा महिन्यांनी हत्येचा कट उघडकीस

आणखी वाचा

Comments are closed.