काश्मीरमध्ये सैनिकांना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात झाला.
आठ जवानांसह 9 जण जखमी
वृत्तसंस्था/ जम्मू
जम्मू काश्मीरच्या रियासी जिह्यात सोमवारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात झाला. या अपघातात आठ जवान आणि बस चालकासह नऊ जण जखमी झाले. हा अपघात रियासी जिह्यातील ताराकोट भागाजवळ झाला. सुरक्षा कर्मचारी प्रवास करत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे बस रस्त्यावरून घसरून पलटी झाली. अपघातात जखमी झालेल्या तीन जवानांना पुढील उपचारांसाठी नारायणा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर इतर जखमी जवान आणि बस चालकावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
Comments are closed.