लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, फेब्रुवारी-मार्चचा हप्ता कधी मिळणार? आदिती तटकरेंनी सगळं सांगितलं

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. फेब्रुवारीचा हप्ता महिना उलटून गेला तरी लाभार्थी महिलांना मिळाला नव्हता. त्यामुळं लाडक्या बहिणींकडून फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत विचारणा होत होती. आता राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला दिला  जाणार असल्याचं समोर आलं आहे. महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. मार्च महिन्याचा हप्ता विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर विभागाला निधी प्राप्त झाल्यानंतर दिला जाईल, असं तटकरे यांनी म्हटलं.  त्यामुळं लाडक्या बहिणींना मार्च महिन्यात दोन्ही हप्त्यांचे मिळून 3000 रुपये मिळणार आहेत. लाडक्या बहिणींना आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राज्य सरकारकडून गिफ्ट देण्यात येणार आहे.

आंतराष्ट्रीय महिला दिनाला 3000 की 1500 रुपये मिळणार?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात 24 तारखेला देण्यात आला होता. फेब्रुवारी महिन्यातील लाभ न मिळाल्यानं सरकारवर टीका विरोधकांकडून करण्यात येत होती. आता 8 मार्चला म्हणजेच महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महिलांना फेब्रुवारी महिन्यांचे पैसे मिळतील. तर, मार्च महिन्याचे पैसे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर मिळतील, म्हणजेच आंतरराष्ट्रीय महिला दिनाला 1500 महिलांना मिळतील.

महिलांचा प्रतिसाद लाडक्या बहिणींना मिळतोय त्यातून विरोधकांमध्ये नैराश्य पसरलं आहे. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार आहे. मार्च महिन्याचा हप्ता अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर मिळणार असल्याचं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलं.

विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली होती. लाडकी बहीण योजनेतंर्गत पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळाली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठ्याप्रमाणावर महिलांची मतं मिळाली होती. मात्र, विधानसभा निवडणूक संपल्यानंतर राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या निकषांची काटेकोर अंमलबजावणी सुरु केली होती. तसेच लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी आणि जिवंत असल्याचा दाखला सक्तीचा करण्यात आला होता. याशिवाय, लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणाऱ्या महिलांच्या घरी चारचाकी आहे किंवा नाही, हे तपासायला सर्वेक्षण सुरु करण्यात आले होते. यामुळे लाडकी बहीण योजनेतील तब्बल 8 लाख लाभार्थी महिला अपात्र ठरल्या होत्या.

दरम्यान, जुलै ते जानेवारी महिन्यापर्यंत लाडक्या बहिणींना प्रत्येकी 10500 रुपये मिळाले आहेत. तर, अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम 2100 होणार का याकडे सर्वाचंं लक्ष लागलं आहे.

इतर बातम्या :

लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, फेब्रुवारी-मार्चचा हप्ता कधी मिळणार? आदिती तटकरेंनी सगळं सांगितलं

अधिक पाहा..

Comments are closed.