आरबीआय आणखी एक गुड न्यूज देणार, एप्रिलमध्ये रेपो रेटमध्ये कपातीची शक्यता, कर्जदारांना दिलासा
मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पतधोरण समितीच्या बैठकीत मोठा घेतला निर्णय जाऊ शकतो. फेब्रुवारी महिन्यात किरकोळ महागाई दर घटला आहे. किरकोळ महागाई दर 4 टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे. 12 मार्चला सांख्यिकी मंत्रालयानं किरकोळ महागाईचे दर जाहीर केले आहेत. ते 3.61 टक्क्यांवर आहेत. जानेवारीमध्ये हा दर 4.3 टक्के होता. महागाई दर कमी झाल्यानं एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात रेपो रेटबबात मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो.
एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात 7-9 एप्रिल दरम्यान आरबीआयचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांच्या अध्यक्षतेत पतधोरण समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत ईएमआयमुळं त्रस्त असलेल्या लोकांना दिलासा मिळेल. यापूर्वी आरबीआयनं 7 फेब्रुवारीला रेपो रेटमध्ये कपात केली होती. रेपो रेट 6.50 टक्क्यांवरुन 6.25 टक्क्यांवर आणला होता. आता नव्या आर्थिक वर्षात आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक जेव्हा होईल तेव्हा त्यामध्ये कपातीचा निर्णय़ होईल.
फेब्रुवारी महिन्यात खाद्य पदार्थांच्या महागाईच्या दरात मोठी घट पाहायला मिळाली होती. खाद्य महागाई दर 5.97 टक्क्यांवरुन 3.75 टक्क्यांवर आला आहे. खाद्य पदार्थांची महागाई आरबीआयसाठी चिंतेचं कारण बनलं होतं. भाजीपाल्याच्या दरात घसरण झाल्यानं महागाईच्या दरात घसरण झाली आहे. चांगल्या रब्बी हंगामामुळं महागाई आणखी घटण्याचा अंदाज आहे. त्यामुळं आरबीआय येत्या तिमाहीत देखील रेपो रेटमध्ये कपात करेल अशी शक्यता आहे.
सीपीआय महागाई 4 महिन्यांच्या निचांकी पातळीवर आहे. खाद्य पदार्थांच्या किमती कमी झाल्यानं हे शक्य झालं आहे. खाद्य पदार्थांवरील महागाईवर लक्ष ठेवून अर्थव्यवस्थेतील पुरवठा आणि विक्री वाढवता येऊ शकते. रिटेल महागाई दर 4 टक्क्यांच्या जवळ असल्यानं एप्रिल महिन्यात पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो रेट कपातीचा निर्णय होऊ शकतो. फेब्रुवारीत रेपो रेट जाहीर करताना संजय मल्होत्रा यांनी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये महागाई दर घटल्याचं सांगितलं होतं.
आरबीआयकडून यापूर्वी खरीप हंगामातील चांगलं उत्पादन, हिवाळ्यात भाजीपाल्यांच्या दरात झालेली घसरण, रब्बी हंगामातील चांगल्या उत्पादनाची आशा यामुळं खाद्य पदार्थांच्या महागाई कमी होऊ शकते. या सर्व गोष्टींचा विचार करुन आरबीआयकडून पतधोरण जाहीर केलं जाईल. संजय म्हलोत्रा गव्हर्नर म्हणून दुसरं पतधोरण जाहीर करणार आहेत.
दरम्यान, आरबीआयनं फेब्रुवारी महिन्यात पतधोरण जाहीर केलं तेव्हा रेपो रेट 6.50 टक्क्यांवरुन 25 बेसिस पॉईंट कमी करत 6.25 टक्क्यांवर आणला होता. आता येत्या काळात रेपो रेट किती कमी होतो, याकजे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
इतर बातम्या :
अधिक पाहा..
Comments are closed.