बायजूचे संस्थापक रविंद्रन बायजू यांना सिंगापूर न्यायालयाने ठोठावली सहा महिन्यांच्या तुरुंवासाची शिक्षा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

एकेकाळी शिक्षण क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या बायजूचे संस्थापक रवींद्रन बायजू यांना सिंगापूर न्यायालयाकडून सहा महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आल्याचे समजते. न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणाच्या खटल्यात सिंगापूर न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली आहे. इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिले आहे.

न्यायालयाने दिलेल्या माहितीनुसार, रवींद्रन यांनी एप्रिल २०२४ पासून त्यांच्या मालमत्तेशी संबंधित प्रकरणात न्यायालयाच्या अनेक आदेशांचे वारंवार उल्लंघन केले आहे. त्यामुळे न्यायालयाने त्यांना सहा महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. रवींद्रन यांना तात्काळ पोलिसांसमोर शरण येण्यास सांगण्यात आले आहे.

तसेच तुरुंगवासासोबतच त्यांना ९०,००० सिंगापूर डॉलर्सचा (सुमारे ७०,५०० अमेरिकन डॉलर्स किंवा अंदाजे ६० लाख रुपये) दंडही ठोठावण्यात आला आहे. रवींद्रन  बायजू सध्या सिंगापूरमध्ये आहेत की इतर कुठे, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही.

Comments are closed.