NASA ची मोठी घोषणा; चंद्रावर कायमस्वरूपी बेस बनवणार, रोव्हर्स चालवणार, ड्रोन उडणार! यावर्षी होणार ३ मोहिमा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

चंद्राभोवतीची प्रदक्षिणा यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर आता नासाने (NASA) मोठी तयारी सुरू केली आहे. पृथ्वीचा उपग्रह असलेल्या चंद्रावर कायमस्वरूपी तळ (बेस) उभारण्याची तयारी करण्यात येणार आहे. हा नासाचा अत्यंत महत्त्वाकांशी प्रकल्प मानव प्रगतीच्या दृष्टीने एक नवा इतिहास रचणारा ठरणार आहे. याचाच एक भाग म्हणून नासाने (NASA) या वर्षात चंद्रावर तीन मोहिमा करणार असल्याची घोषणा केली आहे.

मंगळावारी आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत नासाचे प्रशासक जेरेड आयझॅकमन यांनी मंगळवारी चंद्रावर कायमस्वरूपी तळ उभारण्यासाठी २० अब्ज डॉलर्सची योजना जाहीर केली. या मोहिमेत चंद्राच्या पृष्ठभागावर भ्रमण करण्यासाठीच्या रोव्हर्स आणि ड्रोनचा समावेश असेल असेही सांगण्यात आले. रोव्हर्स आणि ड्रोनद्वारे विविध चाचण्या आणि प्रयोग केले जातील. तसेच चंद्रावरील धोकादायक परिस्थितीत राहण्याचे आणि काम करण्याचे तंत्र आत्मसात करण्यास मानवाला मदत करतील.

‘अमेरिका पुन्हा एकदा चंद्रावर परतत आहे. हा मून बेस अमेरिका आणि संपूर्ण मानवजातीसाठी परग्रहावरील आऊटपोस्ट असणार आहे’, असे आयझॅकमन म्हणाले. पीटीआय वृत्त.

Comments are closed.