नाईट शिफ्ट करून सकाळी घरी आला; दरवाजा वाजवला पण… दार तोडताच दिसला आई-वडिलांचा मृतदेह, पुण्यात

पुणे : पुण्यातील कोंढव्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, कोंढवा परिसरातील (Pune News) एका चाळीमध्ये दाम्पत्य मृतावस्थेत आढळल्याची घटना समोर आली आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी (Pune News) अकस्मात मृत्यूची नोंद केली आली आहे, शवविच्छेदन अहवालानंतर दाम्पत्याच्या मृत्यूमागचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी (Pune Police) दिली. तर प्रकाश मुंडे (५२) आणि ज्ञानेश्वरी मुंडे (४८) अशी मृतावस्थेत आढळेलल्या दाम्पत्याची नावं आहेत. मृत मुंडे कुटुंबीय कोंढव्यातील श्रद्धानगर भागामध्ये असलेल्या एका चाळीमध्ये वास्तव्यास होते.(Pune News)

Pune News: नेमकं काय प्रकरण?

घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुंडे दाम्पत्याचा मुलगा गणेश (२३) हा एका खासगी कंपनीमध्ये नोकरीला आहे. तो शुक्रवारी (दि. ९) सकाळी रात्रपाळीवरून (Pune News) घरी आला. तेव्हा घराचा दरवाजा बंद होता. गणेशने घरी आल्यानंतर दरवाजा वाजवला. मात्र, घरातून कसलाच प्रतिसाद आला नाही. यामुळे घाबरलेल्या गणेशने शेजाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडण्यात आला. तेव्हा वडील प्रकाश आणि ज्ञानेश्वरी हे बेशुद्ध असलेल्या अवस्थेत पडले असल्याचे आढळून आले. मुंडे दाम्पत्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारांपूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता, अशी माहिती समोर आली आहे.(Pune News)

Pune News: पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली

तर यामधील मृत ज्ञानेश्वरी यांना ब्रेन ट्यूमर होता. वर्षभरापासून त्या आजारी होत्या. तर त्यांचे पती प्रकाश हे चालक म्हणून काम करत होते. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. दोघांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवालानंतर त्यांच्या मृत्यूचं मूळ कारण समजू शकेल. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे’, अशी माहिती येवलेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमर काळंगे यांनी दिली.

तर या घटनेनंतर कोंढव्यातील श्रद्धानगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, ज्ञानेश्वरी यांच्या आजारपणाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलले गेले की दोघांच्या मृत्यूमागे काही अन्य कारण आहे, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

आणखी वाचा

Comments are closed.