कॅनडा सरकारचा मोठा निर्णय; खलिस्तानी जहालवाद्यांना घोषित केले राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कॅनडाच्या गुप्तचर संस्थेने खलिस्तानी जहालवाद्यांना राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका असल्याचे घोषित केले आहे. हे गट कॅनडातील संस्थांचा वापर त्यांच्या हिंसक जहालवादी अजेंडा राबवण्यासाठी करत असल्याचे संस्थेने म्हटले आहे. ‘पीटीआय’ (PTI) या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कॅनडियन सिक्युरिटी इंटेलिजन्स सर्व्हिसने (CSIS) त्यांच्या २०२५ च्या सार्वजनिक अहवालात नमूद केले आहे की, कॅनडा येथील खलिस्तानी जहालवाद्यांचा (CBKE) हिंसक कारवायांमध्ये असलेला सहभाग हा कॅनडा आणि कॅनडाच्या हितसंबंधांसाठी सतत धोका निर्माण करत आहे. शुक्रवारी कॅनडा सरकारच्या वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या या अहवालानुसार, काही जहालवादाचे समर्थक कॅनेडियन संस्थांचा वापर करून निधी गोळा करतात आणि नंतर हा पैसा हिंसक कारवायांकडे वळवला जातो.

हा अहवाल एअर इंडियाच्या ‘फ्लॅट १८२’ बॉम्बस्फोटाच्या ४० व्या स्मृती दिनानंतर एका वर्षाने आला आहे. या भीषण दहशतवादी हल्ल्यातील संशयित हे कॅनडास्थित खलिस्तानी गटांचे सदस्य होते. या हल्ल्यात ३२९ लोकांचा मृत्यू झाला होता. ज्यातील बहुतेक कॅनेडियन नागरिक होते. कॅनडाच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला असल्याचे अहवालात म्हटले आहे.

Comments are closed.