मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 11.82 कोटींचा गांजा जप्त, बँकॉकहून आलेल्या महिलेला अटक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई केली. या कारवाईत 11.82 कोटी रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी बँकॉकहून आलेल्या एका महिला प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, सीमाशुल्क विभागाच्या नियमित तपासणीदरम्यान बँकॉकहून आलेल्या महिलेच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. यानंतर अधिकाऱ्यांनी तिच्या ट्रॉली बॅगची कसून तपासणी केली. तपासणीदरम्यान, बॅगेतून व्हॅक्यूम-सील केलेले 12 पारदर्शक प्लास्टिकचे पॅकेट्स जप्त करण्यात आले. या पॅकेट्समध्ये एकूण 11.824 किलोग्रॅम हायड्रोपोनिक गांजा लपवण्यात आला होता. या गांजाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 11.82 कोटी रुपये आहे. आरोपी महिला एका खाजगी कंपनीत रिलेशनशिप मॅनेजर म्हणून काम करत होती, असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

सीमाशुल्क विभागाने आरोपी महिलेवर नारकोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. चौकशीनंतर न्यायालयात हजर करण्यात आले, असता तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. हा गांजा कुणाकडे पोहचवण्यात येणार होता, याबाबत तपास सुरू आहे.

Comments are closed.