अकोल्यात खंडणी मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यासह एका सुरक्षारक्षकावर गुन्हा दाखल; कारवाई न करण्यासाठ
अकोला: खंडणी मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यासह एका सुरक्षारक्षकावर गुन्हा दाखल झाला आहे. कारवाई न करण्यासाठी पैसे मागणाऱ्या पोलिस शिपायासह मध्यवर्ती बस स्थानकाच्या सुरक्षारक्षकावर हा गुन्हा दाखल झाला आहे. छेडछाडीच्या आरोपावरून एका तरुणाला सुरक्षा रक्षक सुरज इंगळे आणि राहुल इंगळे या पोलीस कर्मचाऱ्याकडून तरुणाला बेदम मारहाण झाली होती. त्यानंतर कारवाई न करण्यासाठी त्याच्याकडून 1500 रुपये घेतले. या प्रकरणात अकोल्यातल्या सिव्हिल लाईन पोलिसांत कारवाईची भीती दाखवत खंडणी घेणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
दरम्यान, ओम कोरडे असं मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर राहुल इंगळे असं पोलीस शिपायचं आणि सुरज इंगळे असं बस स्थानकाच्या सुरक्षारक्षकाचं नाव आहे. दरम्यान, सुरुवातीला पोलिस तक्रार घेण्यास टाळाटाळ करीत होते. मात्र, भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर आणि आमदार प्रकाश भारसाकळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यावर कारवाईला वेग आला. या प्रकरणामुळ पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
अकोल्यात बातमी छापल्याच्या रागातून उर्दू दैनिकाच्या संपादकांपर्यंत हल्ला
अकोल्यात बातमी लावल्याचा रागातून पत्रकारांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. पाच ते सहा तरुणांनी कोयत्याने हल्ला चढवत जवळपास चार जणांना जखमी केले आहे. अकोल्यातल्या जनता भाजी बाजारात ही घटना घडलीये. दरम्यान अकोला पोलिसांनी 2 जणांना तडीपार केलं होतं. या संदर्भात स्थानिक उर्दू दैनिक ‘सुफ्फा’मध्ये बातमी प्रकाशित केल्यानंतर तडीपार केलेल्या तरुणांनी बातमी लावल्याच्या रागातून हल्ला चढवला. “सुफ्फा’चे मुख्य संपादक सज्जाद हुसेन आणि त्यांच्या तीन मुलांवर हा हल्ला करण्यात आला आहे. वृत्तपत्रामध्ये तडीपार संदर्भात बातमी प्रकाशित केली होती, त्यावरून हा संपूर्ण वाद झाला आहे. सर्व जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंतर काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी अकोला पोलिसांवर ताशेरे ओढले आहे.
आणखी वाचा
Comments are closed.