पुण्याच्या नवले ब्रीजवरील अपघाताचं कारण अखेर समोर, नेमकी काय चूक झाली? आरटीओच्या तपासातून सत्य


पुणे : काही दिवसांपूर्वी नवले पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातातचे कारण तपासामध्ये (Pune Navale Bridge Accident) समोर आलं आहे. हा भीषण अपघात कंटेनरचा वेग जास्त असल्यामुळे झाल्याचे प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) प्राथमिक तपासणीत दिसले आहे. तसेच, कंटेनर चालकाने (Pune Navale Bridge Accident) उतारावरती गाडी ‘न्यूट्रल’ केल्याची शक्यता असून, अतिवेगामुळे कंटेनरवरील चालकाचे नियंत्रण सुटुन अपघात झाल्याची शक्यता आहे. अंतिम अहवाल आरटीओकडून (Pune Navale Bridge Accident) तयार करण्यात येत आहे. या भीषण अपघातात ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर अनेक जण जखमी झाले होते.(Pune Navale Bridge Accident)

१३ नोव्हेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास नवले पुलाजवळ भरधाव कंटेनरचा अपघात (Pune Navale Bridge Accident) झाल्याने आग लागून कार व कंटेनरमधील आठ जणांचा मृत्यू झाला होता. यात कार व कंटेनर आगीमध्ये जळून खाक झाला होता. या अपघाताची तांत्रिक तपासणी आरटीओकडून करण्यात येत आहे. परंतु कंटेनरचा गिअर बॉक्स जळाल्यामुळे हा अपघात कसा झाला, हे शोधण्यात अडचणी येत होत्या. आरटीओच्या (Pune Navale Bridge Accident) अधिकाऱ्यांनी तांत्रिक व महामार्गावरील सीसीटीव्हीच्या माध्यमातून माहिती गोळा करत होते. त्यावेळी कंटेनरचा वेग जास्त होता. पुलाजवळ चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचे आढळले. दरम्यान सातारा ते पुणेदरम्यान वाहनांच्या तपासणीसाठी आता आणखी एक पथक वाढवल्याने आता दोन पथकांमध्ये १० अधिकारी वाहनांची तपासणी करतील. एक पथक फिरते राहणार असून, दुसरे वाहनांची तपासणी करणार आहे.(Pune Navale Bridge Accident)

दरम्यान नवले पुलाचा अपघात कसा झाला? याबाबत आरटीओच्या प्राथमिक अहवालात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नवले पुलाजवळील अपघात अतिवेगामुळे झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, आरटीओचा  प्राथमिक अहवाल समोर आला आहे. चालकाने कंटेनर न्यूट्रल केल्याची शक्यता अहवालात दर्शवली आहे. कंटेनरचा वेग जास्त असल्यामुळे नवले पुलाजवळील अपघात झाल्याची  RTOच्या प्राथमिक तपासणीमध्ये आढळले आहे. या अपघाताचे कारण ड्राइव्हरची चूक असल्याचे दिसून आले आहे. याबाबतचा अंतिम अहवाल तयार करण्याचे काम RTO विभागाकडून सुरू आहे. नवलेपुलाजवळ 13 नोव्हेंबरला कंटेनर चालक आणि वाहनांना उडवलं त्यानंतर एका कारला धडक दिल्यानंतर ती कार पुढे अडकून कंटेनर ट्रकला धडकला. यामध्ये आग लागून कार आणि कंटेनर मधील आठ जणांचा मृत्यू झाला होता.

आणखी वाचा

Comments are closed.