धावत्या ट्रेनमध्ये दिवा लावणाऱ्या प्रवाशावर मध्य रेल्वेकडून कठोर कारवाई

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

धावत्या ट्रेनमध्ये दिवा लावून प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या एका प्रवाशावर मध्य रेल्वेने कठोर कारवाई केली आहे. रेल्वे कायदा 1989 च्या कलम 153 आणि 145(ब) अन्वये आरोपीवर कारवाई करण्यात आली. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, आरोपीला भारतीय न्याय संहिता च्या कलम 35(क) अन्वये नोटीस देऊन सोडण्यात आले.

हजरत निजामुद्दीन – म्हैसूर एक्सप्रेसच्या कोच ए-1 मधील बर्थ क्रमांक 17 वर एका प्रवाशाने 31 ऑगस्ट रोजी दिवा लावून पूजा केली. याबाबत भुसावळ येथील कमर्शियल कंट्रोलकडून माहिती मिळाली. यानंतर तिकीट तपासनीस यांनी पुढील आवश्यक कारवाईसाठी त्या प्रवाशाला भुसावळ रेल्वे स्थानकावर गाडीतून खाली उतरवले.

गरिबा (55) या प्रवाशाने सायंकाळची प्रार्थना करताना आपल्या आरक्षित बर्थवर दिवा लावला होता. कर्तव्यावर असलेल्या टीटीईने त्याला दिवा विझवण्याचा सल्ला दिला होता. मात्र, त्या प्रवाशाने प्रार्थना पूर्ण झाल्यानंतरच दिवा विझवण्याचा आग्रह धरला. टीटीइ ने आपल्या मोबाईल फोनवर या घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही केले होते. त्याच्याकडून आगपेटी, पितळी दिवा आणि स्टीलचा डबा जप्त करण्यात आले आहे.

Comments are closed.