१६ व्या वित्त आयोगाचा ९ कोटींच्या आराखड्याची टिप्पणी कुठेय? शिवसेना गटनेते विक्रांत जाधव यांचा महायुतीच्या मनमानी कारभाराला भर सभागृहात सवाल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रत्नागिरी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिलेदारांनी गाजवली. १६ व्या वित्त आयोगाच्या ९ कोटी रुपयांच्या आराखड्याच्या ठरावावर कोणतीही चर्चा न करता संख्याबळाच्या जोरावर तातडीने मंजूरी देण्याच्या सत्ताधारी महायुतीच्या प्रयत्नांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते विक्रांत जाधव यांनी तीव्र विरोध करत सभेच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त केली. १६ व्या वित्त आयोगाच्या ९ कोटी रुपयांचा ठराव मांडताय त्याची टिप्पणी कुठे आहे? असा खणखणीत सवाल विचारताच अधिकाऱ्यांची बोबडी वळली. वित्त ठराव हा प्रशासनाने मांडायचा असतो तुम्ही पदाधिकारी काय मांडताय? त्यावर सदस्यांची मते का जाणून घेत नाहीत असा सवाल विक्रांत जाधव यांनी सभागृहात उपस्थित केला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते विक्रांत जाधव यांनी १६ व्या वित्त आयोगाच्या ठरावा विरोधात आमची सहा मते आहेत.जर टिप्पणी मांडली असती आणि त्यावर चर्चा झाली असती तर हा ठराव सर्वानुमते मंजूर झाला असता.यापूर्वी वित्त आयोगाच्या आराखड्यांचे ठराव झाले त्यावेळी सदस्यांसमोर टिप्पणी ठेवली जायची.सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे सदस्य त्यावर मत मांडायचे. आता ही चर्चा न करता, टिप्पणी न ठेवता ठराव मंजूर करण्याची कार्यपद्धत कुठून आणली. आम्ही दाद कुणाकडे मागायची? असा सवाल उपस्थित करत सहा सदस्यांचा ठरावाला विरोध असल्याची भूमिका मांडली.

गुहागर तालुक्यातील ८ निविदा का रद्द केल्या?

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कामाच्या १८ निविदा निघाल्या.त्यापेकी गुहागर तालुक्यातील ८ निविदा रद्द का केल्या? या प्रश्नांवरून अधिकाऱ्यांना शिवसेना गटनेते विक्रांत जाधव यांनी जाब विचारला. अंजनवेल येथील विकासकामाचे ८ लाख रुपये परत गेले. तुरंब प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची निविदा निघून अडीच महिने झाले तरी कार्यारंभ आदेश का दिला नाही.त्याकामाचे पैसे डिसेंबर महिन्यात परत जातील.मग अधिकारी काय काम करतात? असा सवाल  विक्रांत जाधव यांनी उपस्थित केला.

Comments are closed.