आषाढीनिमित्त वारकऱ्यांसाठी 54 विशेष रेल्वे फेऱ्या, वाचा पंढरपूरला जोडणाऱ्या रेल्वे फेऱ्यांचा तपशील

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने मोठा दिलासा दिला आहे. यंदा आषाढी वारीसाठी ५४ विशेष रेल्वे फेऱ्या चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या विशेष रेल्वेगाड्यांचा समावेश असून, बहुतांशी गाड्या अनारक्षित असणार आहेत.

पंढरपूरला जोडणाऱ्या रेल्वे फेऱ्यांचा तपशील

नागपूर-मिरज आषाढी विशेष (४ फेऱ्या) गाडी क्र. ०१२०५ विशेष नागपूरहून २३ व २४ जुलै रोजी सकाळी ८.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११.५५ वाजता मिरज येथे पोहोचेल. (दोन फेऱ्या)

पंढरपूर आगमन-प्रस्थान सकाळी ८.००-८.२५

गाडी क्र. ०१२०६ विशेष मिरजहून २४ व २५ जुलै रोजी दुपारी १२.५५ वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी दुपारी १२.२५ वाजता नागपूर येथे पोहोचेल. (दोन फेऱ्या)

पंढरपूर आगमन-प्रस्थान दुपारी ३.५५-५.०० नवीन अमरावती-पंढरपूर आषाढी विशेष (चार फेऱ्या) गाडी क्र. ०१११९ विशेष नवीन अमरावतीहून २१ व २४ जुलै रोजी दुपारी २.४० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी सकाळी ९.१० वाजता पंढरपूर येथे पोहोचेल. (दोन फेऱ्या)

गाडी क्र. ०११२० विशेष पंढरपूरहून २२ व २५ जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी दुपारी १२.५० वाजता नवीन अमरावती येथे पोहोचेल. (दोन फेऱ्या)

खामगाव-पंढरपूर आषाढी विशेष (चार फेऱ्या): गाडी क्र. ०११२१ विशेष खामगावहून २२ व २५ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता पंढरपूर येथे पोहोचेल. (दोन फेऱ्या)

गाडी क्र. ०११२२ विशेष पंढरपूरहून २३ व २६ जुलै रोजी सकाळी ५.०० वाजता सुटेल व त्याच दिवशी सायंकाळी ७.३० वाजता खामगाव येथे पोहोचेल. (दोन फेऱ्या)
भुसावळ-पंढरपूर अनारक्षित आषाढी विशेष

(चार फेऱ्या) : गाडी क्र. ०११५९ विशेष भुसावळहून २४ व २५ जुलै रोजी दुपारी १.३० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता पंढरपूर येथे पोहोचेल.

गाडी क्र. ०११६० विशेष पंढरपूरहून २५ व २६ जुलै रोजी रात्री १०.३० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी दुपारी १.०० वाजता भुसावळ येथे पोहोचेल.

आरक्षण व तिकीट बुकिंग

विशेष शुल्कासह चालविण्यात येणाऱ्या आषाढी विशेष रेल्वेगाड्यांचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर, तसेच संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे. अनारक्षित डब्यांसाठी तिकिटे स्थानकांवरील बुकिंग काऊंटर, तसेच अॅपद्वारे उपलब्ध असतील. प्रवाशांनी वैध तिकिटासह प्रवास करून गैरसोय टाळावी, असे आवाहन करण्यात आले.

Comments are closed.