महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे 15 अनारक्षित विशेष रेल्वे सेवा चालवणार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे 4 डिसेंबर ते 8 डिसेंबर 2026 या कालावधीत 15 अनारक्षित विशेष गाड्या चालवणार आहे.
नागपूर ते सीएसएमटी – 4 सेवा
4 डिसेंबर रोजी गाडी क्र. 01260 नागपूर-सीएसएमटी विशेष गाडी नागपूरहून 18.10 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 10.55 वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक 01262 नागपूर-सीएसएमटी विशेष गाडी नागपूरहून 23.55 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 16.15 वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल.
5 डिसेंबर रोजी गाडी क्रमांक 01264 नागपूर-सीएसएमटी विशेष गाडी नागपूरहून 7.40 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 23.55 वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक 01266 नागपूर-सीएसएमटी विशेष गाडी नागपूरहून 18.10 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 10.55 वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल.
सीएसएमटी ते नागपूर – 4 सेवा
6 डिसेंबर रोजी गाडी क्र. 01249 सीएसएमटी-नागपूर विशेष गाडी सीएसएमटी येथून रात्री 20.25 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11.20 वाजता नागपूरला पोहोचेल.
7 डिसेंबर रोजी गाडी क्र. 01251 सीएसएमटी-नागपूर विशेष गाडी सीएसएमटी येथून सकाळी 10.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री 00.55 वाजता नागपूरला पोहोचेल. गाडी क्र. 01255 सीएसएमटी-नागपूर विशेष गाडी सीएसएमटी येथून दुपारी 12.35 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 3.00 वाजता नागपूरला पोहोचेल.
8 डिसेंबर रोजी ट्रेन क्र. 01257 सीएसएमटी-नागपूर विशेष ट्रेन सीएसएमटीहून रात्री 00.25 वाजता सुटून त्याच दिवशी संध्याकाळी 16.10 वाजता नागपूरला पोहोचेल.
नागपूर ते सीएसएमटी दरम्यान सर्व विशेष गाड्यांना अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, जलंब, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कसारा, कल्याण आणि दादर येथे थांबे देण्यात येतील.
7 डिसेंबर रोजी गाडी क्र. 01253 दादर-नागपूर विशेष गाडी दादरहून 00.40 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 16.10 वाजता नागपूरला पोहोचेल. या गाडीला कल्याण, कसारा, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, नांदुरा, जळंब, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम आणि अजनी येथे थांबे देण्यात येतील.
महापरिनिर्वाण निमित्त कलाबुरगी-सीएसएमटी-कलाबुरगी दरम्यान दोन सेवा चालवण्यात येतील. गाडी क्रमांक 01245 विशेष गाडी 5 डिसेंबर रोजी कलाबुरगीहून 18.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 8.20 वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल. गाडी क्रमांक 01246 विशेष गाडी 7 डिसेंबर रोजी सीएसएमटीहून 00.25 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 11.10 वाजता कलाबुरगी येथे पोहोचेल. या गाड्यांना दादर, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डुवाडी, सोलापूर, अक्कलकोट रोड आणि गंगापूर रोड येथे थांबे देण्यात येतील.
अमरावती-सीएसएमटी-अमरावती दोन विशेष गाड्या चालवण्यात येतील. ट्रेन क्र. 01218 विशेष ट्रेन अमरावतीहून 5 डिसेंबर रोजी 17.45 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 5.25 वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल. ट्रेन क्र. 01217 विशेष ट्रेन सीएसएमटीहून दिनांक 7 डिसेंबर रोजी 00.40 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 12.50 वाजता अमरावतीला पोहोचेल. या गाड्यांना दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, नांदुरा, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर आणि बडनेरा येथे थांबे देण्यात येतील.
कोल्हापूर-सीएसएमटी-कोल्हापूर दरम्यान दोन विशेष गाड्या चालवण्यात येतील. गाडी क्रमांक 01402 विशेष गाडी कोल्हापूरहून 5 डिसेंबर रोजी 16.40 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 4.05 वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल. गाडी क्रमांक 01401 विशेष गाडी सीएसएमटीहून 6 डिसेंबर रोजी 22.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 10.00 वाजता कोल्हापूर येथे पोहोचेल. या गाड्यांना दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, चिंचवड, पुणे, जेजुरी, लोणावळा, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली, मिरज, जयसिंगपूर आणि हातकणंगले येथे थांबे देण्यात येतील.
Comments are closed.